भल्याभल्या VVIP लोकांकडे नसतील, अशा आलिशान कार PM Modi यांच्या ताफ्यात; किंमत 10 कोटी रुपये
भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा ही नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता मानली गेली आहे. त्यातही पंतप्रधान मोदी कोणत्या कारमधून प्रवास करतात आणि त्यांची कार इतर कारपेक्षा कशी वेगळी असते हे जाणून घेण्यासाठी अनेकदा लोकं उत्सुक असतात. हीच बाब लक्षात घेत आज आपण पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कोणत्या कारचा समावेश करण्यात आला आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
पंतप्रधानांसाठी सामान्य कारऐवजी, आर्मर्ड आणि बुलेटप्रूफ कार तयार केली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार कलेक्शनमध्ये अशाच काही उत्कृष्ट आणि हाय-टेक कार्सचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वापरले जाणारे रेंज रोव्हर सेंटिनेल ही एक अतिशय सुरक्षित आणि स्टायलिश एसयूव्ही आहे, ज्याची किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे. यात 5.0 लिटर Supercharged V8 इंजिन दिले गेले आहे, जे 375 बीएचपीची पॉवर देते.
या एसयूव्हीला 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठण्यासाठी फक्त 10.4 सेकंद लागतात. त्याचा टॉप स्पीड 193 किमी/ताशी आहे. या कारमध्ये एक आर्मर्ड बॉडी शेल आणि रन-फ्लॅट टायर्स आहेत, जे टायर पंक्चर झाल्यास देखील 80 किमी/ताशी वेगाने 50 किमी पर्यंत धावू शकतात. ही एसयूव्ही विशेषतः स्फोट आणि गोळीबारापासून संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात समाविष्ट असलेली टोयोटा लँड क्रूझर ही एक अतिशय पॉवरफुल आणि सुरक्षित एसयूव्ही आहे, ज्याची किंमत 2 कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. यात 4.5 -लिटर डिझेल इंजिन आहे, जे 260 बीएचपी पॉवर आणि 650 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार बुलेटप्रूफ प्लेटिंग आणि ग्लासने सुसज्ज आहे, तसेच त्यात ब्लास्ट प्रोटेक्शन सारखे विशेष सेफ्टी टेक्नॉलॉजी समाविष्ट केली गेली आहे.
मर्सिडीज-मेबॅक एस६५० गार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात महागड्या आणि सुरक्षित कारपैकी एक आहे, ज्याची किंमत तब्बल 12 कोटी रुपये आहे. यात 6.0 -लिटर ट्विन टर्बो V12 इंजिन आहे, जे 630 bhp पॉवर निर्माण करते. या कारमध्ये VR10 लेव्हलची सुरक्षा आहे, जी जगातील सर्वोच्च बुलेटप्रूफ सुरक्षा श्रेणी मानली जाते. ही कार हँड ग्रेनेड आणि AK-47 सारख्या शस्त्रांपासून देखील संरक्षण करते. यात ब्लास्ट-प्रूफ चेसिस आणि विंडो ग्लास आणि इन-बिल्ट ऑक्सिजन सप्लाय सिस्टम सारखे फीचर्स देखील आहेत. २०२१ मध्ये, पंतप्रधान मोदी रशियाच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी ही कार वापरली होती.
BMW ७ सिरीज Li ही एक प्रतिष्ठित आणि पॉवरफुल कार आहे, जी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळापासून पंतप्रधानांच्या सुरक्षा काफिलाचा भाग आहे. या कारमध्ये 4.4 लिटर ट्विन टर्बो V8 इंजिन आहे, जे 450+ bhp ची शक्ती देते. त्याची किंमत सुमारे 10 कोटी असल्याचे सांगितले जाते.