फोटो सौजन्य: iStock
मागील काही वर्षांपासून वाहनांवरील जीएसटी कमी करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होती. हीच मागणी लक्षात घेत अखेर केंद्र सरकारने नवीन GST Rates ची घोषणा केली. या GST 2.0 मुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करणे अधिक सोपे आणि कमी खर्चिक होणार आहे. सरकारने 28% टॅक्स स्लॅब 18% पर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
नवीन जीएसटी दरांमुळे Maruti Suzuki Brezza, Hyundai Venue, Kia Sonet, Tata Nexon आणि Mahindra XUV 3XO सारख्या लोकप्रिय एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. त्यांच्या किमती 30000 ते 1.50 लाखांपर्यंत कमी झाल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जीएसटी बदलांमुळे मारुती ब्रेझा खरेदी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. ही 1.5-लिटर इंजिनद्वारे चालते, ज्यावर पूर्वी 45% कर लागत होता, परंतु आता तो 40% पर्यंत कमी करण्यात आला आहे. परिणामी, ब्रेझाची किंमत ₹30,000 ते ₹48,000 पर्यंत कमी करण्यात आली आहे. आता नवीन एक्स-शोरूम किंमत 8.39 लाख ते 13.50 लाखांपर्यंत आहे.
GST 2.0 चा सर्वाधिक फायदा Venue ला झाला आहे. आधी या कारच्या पेट्रोल इंजिनवर 29% आणि डिझेल इंजिनवर 31% इतका कर (Tax) लागायचा. आता मात्र दोन्ही प्रकार 18% कर स्लॅबमध्ये आले आहेत. त्यामुळे Venue ची किंमत तब्बल ₹68,000 ते ₹1.32 लाखांपर्यंत कमी झाली आहे. नवीन किंमत आता ₹7.26 लाख ते ₹12.05 लाखांपर्यंत आहे.
Kia Sonet खरेदीदारांना सुद्धा GST कपातीचा थेट फायदा होणार आहे. यापूर्वी या SUV ची किंमत 8 लाख ते 15.74 लाखांदरम्यान होती. आता यात 70,000 ते ₹1.64 लाखांपर्यंत घट झाली असून, नवीन किंमत 7.30 लाख ते 14.10 लाखांदरम्यान निश्चित झाली.
भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी एक असलेल्या Nexon वरही GST 2.0 चा मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटवर वेगवेगळा टॅक्स लागू होत होता, मात्र आता सर्वांवरच 18% स्लॅब लागू करण्यात आला आहे. यामुळे Nexon ची किंमत 68,000 ते 1.55 लाखांपर्यंत कमी झाली आहे. नवीन किंमत आता 7.32 लाख ते 13.88 लाखांदरम्यान असेल.
Mahindra ने तर GST 2.0 लागू होण्यापूर्वीच ग्राहकांना फायदा देण्यास सुरुवात केली होती. 6 सप्टेंबरपासूनच XUV 3XO च्या किंमतीत कपात करण्यात आली. या SUV ची किंमत आता 71,000 ते 1.56 लाखांपर्यंत कमी झाली असून, नवीन किंमत 7.28 लाख ते 14.40 लाखांदरम्यान आहे.