फोटो सौैजन्य: X.com
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सामन्यांमध्ये जशी इलेक्ट्रिक कारची क्रेझ पाहायला मिळते तशीच क्रेझ सेलिब्रेटी मंडळींमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रेटी आपल्या कार कलेक्शनमध्ये इलेक्ट्रिक कार्सचा समावेश करत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नवीन आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.
अलीकडेच, CS12 व्लॉग्सने त्यांच्या YouTube चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंगने त्याच्या नवीन Hummer EV ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये Hummer EV त्याच्या घराच्या गेटच्या आत एका फ्लॅटबेडवर जाताना दिसत आहे. या ट्रकच्या मागे आणखी एक Hummer देखील दिसत आहे, ज्यावर ‘फ्रायडे नाईट कार्स’ असे ब्रँडिंग होते. डिलिव्हरीनंतर, रणवीर सिंग हिरव्या नंबर प्लेटसह त्याची नवीन Hummer EV चालवताना दिसला आहे.
राहुल गांधींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत भेट टाळली? गांधी कुटुंब कन्नडविरोधी म्हणत भाजपचा निशाणा
सध्या तरी ही कार भारतीय मार्केटमध्ये विकली जात नसून ती आयात केली जात आहे. GMC Hummer EV जागतिक स्तरावर दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, जे 2X आणि 3X आहेत. त्याच्या 2X व्हेरिएंटमध्ये ड्युअल-अल्टियम मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सेटअप आहे, जे 625 bhp पॉवर जनरेट करतो. त्याचा 3X व्हेरिएंट 830 bhp आणि 15,592 Nm टॉर्क जनरेट करते. रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगने 3X व्हर्जन खरेदी केली आहे.
या मोठ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 178 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे, जे पूर्ण चार्ज केल्यावर 505 किमीची रेंज देतो असा दावा केला जातो. हमर ईव्ही ही एक दमदार एसयूव्ही आहे, ज्याचे वजन 4,500 किलोपेक्षा जास्त आहे. इतकी जड असूनही, ती फक्त 3.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
या कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत, ज्यात 12.3-इंचाचा मोठा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जीएमसी सुपर क्रूझ, 13.4-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स यांचा समावेश आहे. ही कार एक्स्ट्रॅक्ट मोडमध्ये एअर राइड अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन वापरून ग्राउंड क्लीयरन्स सुमारे 6 इंचांनी वाढवू शकते आणि ती सुमारे 810 मिमी खोल पाण्यात सहजपणे पार करते.
ADAS सेफ्टी फिचर आणि 9 एअरबॅग्स ! Fortuner सारखीच Toyota Camry 2025 पॉवरफुल आहे का?
अमेरिकेत नवीन हमर ईव्हीची किंमत सुमारे 84 लाख रुपये आहे, परंतु भारतात इम्पोर्ट ड्युटी आणि इतर टॅक्स मुळे त्याच हमर ईव्हीची किंमत 3.8 कोटी ते 4.5 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. रणवीर सिंगने त्याच्या हमर ईव्हीवर नेमका किती खर्च केला आहे हे माहित नाही.