फोटो सौजन्य: iStock
हल्ली अनेक रायडींग प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आहेत, ज्याचा वापर दैनंदिन आयुष्यात कित्येक लोकांकडून केला जातो. आज खासकरून शहरात अशा रायडींग प्लॅटफॉर्म्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. साधं ऑफिसला जाताना आणि तिथून परत येताना अनेक कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचारी ओला, उबर आणि रॅपीडोसारख्या अॅप्सचा वापर करून कॅब बुक करत असतात. असे अॅप्स वापरताना महिलांच्या सुरक्षिततेचे काय असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.
महिलांची सुरक्षा हा गंभीर प्रश्न आहे. अनेक घटनांमधून रात्री टॅक्सीतून फिरताना महिलांसोबत गैरवर्तवणूक केली जाते. हाच प्रकार थांबवण्यासाठी सरकार आणि अनेक टॅक्सी पुरवणाऱ्या कंपनीज देखील याबाबत सातत्याने महत्वाचे पावले उचलत आहेत. बाईक किंवा कार टॅक्सीने प्रवास करताना महिलांना पूर्ण सुरक्षितता मिळेल याचीही काळजी घेतली जात आहे. याबाबत रॅपिडो आणि उबरने त्यांच्या ग्राहकांसाठी तसेच महिला ड्रायव्हर्ससाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
Toll Tax वसूल करून केंद्र सरकारला ‘अच्छे दिन’, शून्य कमी पडतील एवढी रक्कम तिजोरीत जमा
उबरने नुकतेच आपली सेफ्टी पॉलिसी बदलली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी उबरमध्ये कोणतीही अडचण किंवा समस्या आल्यास एक खास टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, त्याद्वारे केवळ एका क्लिकवर कॉल थेट पोलिसांपर्यंत पोहोचतो. यामुळे महिलांची सुरक्षितेबाबत कंपनी किती जागरूक आहे हे दिसून येत आहे.
उबरने आपल्या रायडिंग ॲपमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा समाविष्ट केली आहे. याशिवाय, विशेषत: रात्री प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महिला रायडर प्रेफरन्स (WRP) या पर्यायातील ॲपच्या फीचर्समध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. WRP मधील बदलामुळे Uber च्या महिला चालकांना केवळ महिला प्रवाशांचीच बुकिंग घेता येणार आहे.
Rolls-Royce च्या ‘या’ कारचा EMI एवढा की दर महिन्याला विकत घ्याल नवीन कार
यासोबतच लोकांची टॅक्सीमध्ये गैरसोय होत असल्यास किंवा सुरक्षेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास लोकं आता ॲपमध्येच त्यांच्या ट्रिपचा ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. ड्रायव्हर आणि प्रवासी दोघेही हे रेकॉर्डिंग करू शकतील आणि दोघांनाही हे रेकॉर्डिंग सेफ्टी रिपोर्टमध्ये सादर करण्याचा अधिकार असेल.
रॅपिडोमध्ये प्रवास करताना लोकेशन ट्रॅकिंगसह सेफ्टी ऑप्शन देखील दिलेला आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही रॅपिडोच्या सेफ्टी टूलकिटवर पोहोचता. या टूलकिटमध्ये लोकेशन शेअरिंगचा ऑप्शन उपलब्ध आहे. काही समस्या असल्यास, रॅपिडो SOS हेल्पलाइन नंबरवर देखील कॉल करता येईल. याशिवाय, या टूलकिटच्या तळाशी पोलिस हेल्पलाइन नंबर 112 चा वेगळा ऑप्शन देखील देण्यात आला आहे, ज्यावर तुम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कॉल करू शकता. तुमच्या फक्त एका क्लिकवर पोलिसात तक्रार नोंदवली जाऊ शकते.