Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSRP Plate: आता वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य, चारचाकी आणि दुचाकीला किती येणार खर्च?

राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे. राज्यात एचएसआरपी (HSRP) लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 01, 2025 | 05:10 PM
केंद्रांची संख्या वाढवावी,

केंद्रांची संख्या वाढवावी,

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे.

राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. उच्चाधिकार समितीने कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे ‘एचएसआरपी ‘ नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.

24,492 च्या ऐवजी बँकेने खात्यात पाठवली 7,08,51,14,55,00,00,000 इतकी मोठी रक्कम, त्यानंतर जे झाले ते…

अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपये, तीन चाकी वाहन ४५० ते ५५०, चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपये, तीन चाकी ५००, चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते. केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे.

वाहन विक्रेत्याकडून ०१ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे. तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम (SIAM) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

वाहन चोरी रोखण्यासाठी एचएसआरपी आवश्यक

HSRP ही वाहन चोरी आणि इतर फसवणुकी रोखण्यासाठी विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांसह एक लायसन्स प्लेट आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी सरकारने एचएसआरपी अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने शेवटची तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

टॅरिफ दर इतर राज्यांच्या बरोबरीचे

सरकारच्या म्हणण्यानुसार, परिवहन आयुक्त कार्यालयाने समितीने मंजूर केलेल्या दरांवर आधारित एचएसआरपी शुल्क निश्चित केले आहे. या शुल्कांमध्ये नंबर प्लेट्स आणि त्यांच्या बसवण्याचा खर्च समाविष्ट आहे.

सरकारने दावा केला आहे की, जीएसटी वगळता इतर राज्यांमध्ये एचएसआरपी दर दुचाकींसाठी ४२०-४८० रुपये, तीन चाकी वाहनांसाठी ४५०-५५० रुपये आणि चारचाकी आणि जड वाहनांसाठी ६९०-८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रात जीएसटी वगळता दुचाकींसाठी ४५० रुपये, तीन चाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी आणि जड वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचे त्यात म्हटले आहे.

इतर राज्यांमध्ये HSRP शुल्क (GST वगळून):

दुचाकी: ₹४२०-₹४८०
तीन चाकी वाहने: ₹४५०-₹५५०
चारचाकी आणि जड वाहने: ₹६९०-₹८००

महाराष्ट्रात HSRP शुल्क (GST वगळून):

दुचाकी: ₹४५०
तीन चाकी वाहन: ₹५००
चारचाकी आणि जड वाहने: ₹७४५

विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) प्रमुख जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र पत्रे लिहून सरकारवर जास्त शुल्क आकारल्याचा आरोप केला आणि कराराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

LPG Price Hike: सर्वसामान्यांना धक्का! एलपीजी सिलेंडरचे वाढले भाव, आता किती रुपये मोजावे लागणार, खिशाला होणार रिकामा

Web Title: Rates of installation of hsrp plates of vehicles in the state similar to rates in other states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Business
  • HSRP
  • maharshtra

संबंधित बातम्या

Farmer Suicide:  १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर
1

Farmer Suicide: १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
2

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

जागतिक नोकऱ्यांवर संकट! TCS, Accenture नंतर आता Lufthansa कंपनी ४००० कर्मचाऱ्यांची करणार कपात
3

जागतिक नोकऱ्यांवर संकट! TCS, Accenture नंतर आता Lufthansa कंपनी ४००० कर्मचाऱ्यांची करणार कपात

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर
4

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.