फोटो सौजन्य: iStock
पूर्वी भारतातील रस्त्यांवर फक्त इंधनावर चालणाऱ्या कारच दिसत होत्या. पण आज ही स्थिती बदलताना दिसत आहे. आज इलेक्ट्रिक वाहनांची संख्या देखील वाढत आहे. ग्राहक देखील वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे EVs च्या खरेदीकडे आपला मोर्चा वळवत आहे. एकंदरीत भारतीय ऑटो मार्केट आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल बनत आहे. हीच अनुकूलता लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष देत आहेत. आता Renault देखील इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी करत आहे. चा जाणून घेऊया कंपनी कोणती इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच रेनॉल्ट कंपनीची पहिली ईव्ही टेस्टिंग दरम्यान पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी Renault Kwid चे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतात लाँच करू शकते. तमिळनाडूमधील चेन्नई विमानतळाजवळ टेस्टिंग दरम्यान Renault Kwid EV दिसली आहे. यापूर्वी देखील ही इलेक्ट्रिक कार वाहन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे.
TVS Jupiter 125 ड्युअल टन पेंट स्कीममध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच दिसणाऱ्या या कारमध्ये Y-आकाराचे टेल लाईट्स असणार आहे. यासोबतच, मागील वायपर आणि स्टीलची व्हील्स देखील त्यात मिळू शकतात. जरी हे फक्त एकच व्हेरियंटसाठी असले तरी लाँचच्या वेळी अनेक व्हेरियंटमध्ये हे दिले जाऊ शकतात, ज्यामध्ये विविध प्रकारचे फीचर्स दिले जातील.
जरी भारतात या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग घेतली जात असली तरी, गेल्या वर्षी ही कार ग्लोबल लेव्हलवर Dacia Spring EV या नावाने सादर केली गेली आहे. भारतात दिसणारे कॅमफ्लाज युनिट या वाहनासारखे दिसते. अशा परिस्थितीत, Dacia Spring EV भारतात Renault Kwid EV या नावाने सादर केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये मिळाला फक्त 1 ग्राहक, अखेर Honda ला 11 वर्षांनंतर बंद केली ‘ही’ बाईक
जागतिक स्तरावर ज्या क्षमतेने Dacia Spring EV लाँच करण्यात आली आहे त्यानुसार, त्याची रेंज सुमारे 225 किमी असू शकते. तसेच, त्यात 48 किलोवॅटची मोटर दिली जाऊ शकते, जी 45 ते 65 हॉर्सपॉवरची पॉवर देऊ शकते. त्यात बसवलेली बॅटरी फक्त 45 मिनिटांत फास्ट चार्जरने 20 ते 80 टक्के चार्ज करता येते.
कंपनीने अद्याप त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या लाँचिंगबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु पुढील वर्षीपर्यंत कंपनी भारतात ही कार लाँच करू शकेल अशी अपेक्षा आहे.