फोटो सौजन्य: @91wheels(X.com)
भारतीय मार्केटमध्ये दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री वाढत आहे. खासकरून यात स्कूटरला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळताना दिसत आहे. याच वाढत्या मागणीमुळे अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट स्कूटर ऑफर करत असतात.
भारतात अनेक लोकप्रिय स्कूटर आहेत. TVS Jupiter ही त्यातीलच एक. आतापर्यंत लाखो ग्राहकांनी या स्कूटरची खरेदी केली आहे. ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार कंपनी देखील स्कूटरमध्ये बदल करताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने नवीन TVS ज्युपिटर 125 आज म्हणजेच 29 मे 2025 रोजी लाँच करण्यात आली आहे. यात कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. ही स्कूटर कोणत्या किमतीत खरेदी करता येईल. त्यात किती शक्तिशाली इंजिन मिळू शकेल. या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
टीव्हीएसने 125 सीसी सेगमेंटमध्ये टीव्हीएस ज्युपिटर 125 चे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने त्यात एक नवीन पेंट स्कीम ऑफर केली आहे. अलीकडेच, सोशल मीडियावर या स्कूटरचा टीझर रिलीज करण्यात आला.
फेब्रुवारी 2025 मध्ये मिळाला फक्त 1 ग्राहक, अखेर Honda ला 11 वर्षांनंतर बंद केली ‘ही’ बाईक
TVS ज्युपिटर 125 आता ड्युअल टोन पेंट स्कीममध्ये उपलब्ध आहे. त्याचा DT-SXC व्हेरियंट ड्युअल टोन पेंट स्कीमसह लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयव्हरी ब्राउन आणि आयव्हरी सिल्व्हरचा समावेश आहे. यासोबतच, त्याला 3D एम्बल आणि बॉडी कलर्ड ग्रॅब रेल देण्यात आली आहे.
या नवीन स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या नवीन व्हेरियंटमध्ये एलईडी हेडलाइट, स्मार्टएक्सनेक्ट, कॉल आणि एसएमएस अलर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, व्हॉइस कमांड, व्हेईकल ट्रॅकिंग अशी अनेक फीचर्स आहेत. यासोबतच, दोन लिटर ग्लोव्ह बॉक्स, 380 मिमी लेग स्पेस, 790 मिमी लांब सीट, डिस्क ब्रेक, फॉलो मी हेडलॅम्प, हॅझार्ड लॅम्प, सर्व्हिस रिमाइंडर, साइड स्टँड इंडिकेटर, 33 लिटर बूट स्पेस अशी फीचर्स देखील त्यात उपलब्ध आहेत.
या स्कूटरच्या इंजिनमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. यात 124.8 सीसी क्षमतेचे एअर कूल्ड इंजिन देखील आहे. जे 8.7 बीएचपी पॉवर आणि 11.1 न्यूटन मीटर टॉर्क देते. यासोबतच, त्यात सीव्हीटी गिअरबॉक्स आणि आयजीओ टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे.
फुल्ल टॅंकवर 500 KM ची रेंज ! Royal Enfield च्या ‘या’ लोकप्रिय बाईकसाठी किती करावे डाउन पेमेंट?
टीव्हीएसने ही स्कूटर भारतीय बाजारात 88942 रुपये एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत 1.04 लाख रुपये असेल.
टीव्हीएस 125 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये ज्युपिटर 125 ऑफर करते. ही स्कूटर बाजारात Honda Activa 125, Hero Destini 125, Hero Xoom 125, Suzuki Access 125, Yamaha Fascino 125, Yamaha Ray ZR125 सारख्या स्कूटरशी थेट स्पर्धा करेल.