फोटो सौजन्य: Social Media
फक्त भारतातच नाही तर जगभरात इलेक्ट्रिक वाहने लाँच होत आहे. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरण पूरक असल्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक वाहन विकत घेत असतात. तसेच वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेकांच्या नाकी नऊ आणत असल्यामुळे इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणत विकल्या जात आहेत. तसेच भविष्यातील काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करीत आहेत.
आधी फक्त इलेक्ट्रिक कार्सच मार्केटमध्ये लाँच होत होत्या. पण आता इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर सुद्धा लाँच होत आहे. अनेक कार उत्पादक कंपनीज सुद्धा आता इलेक्ट्रिक बाईक लाँच करताना दिसत आहे. नुकतेच रेनॉल्ट कंपनीने आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. कंपनीने 2024 च्या पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक ही बाईक इलेक्ट्रिक कारसह सादर केली आहे.
सध्या पॅरिस मोटर शो सुरू झाला आहे. यादरम्यान Renault ने Renault 4 E-Tech इलेक्ट्रिक कार सादर केली. यासोबतच कंपनीने आपली इलेक्ट्रिक मोटरसायकल हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर सादर केली. त्याची किंमत EUR 23,340 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये याची किंमत 21.2 लाख आहे.
Heritage Spirit Scrambler नावाची रेनॉल्ट इलेक्ट्रिक बाईक Annecy या फ्रेंच शहराजवळ, Poissy येथे
Ateliers Heritage Bikes नावाच्या फ्रेंच स्टार्ट-अप कंपनीने तयार केली आहे. ही एक लिमिटेड प्रोडक्शन इलेक्ट्रिक बाईक आहे, ज्याची प्री-ऑर्डर सुरू लवकरच केली जाऊ शकते. पुढील वर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये ही बाईक लाँच केली जाऊ शकते.
हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर दोन व्हेरियंटमध्ये सादर केली जाईल, एक स्टॅंडर्ड आणि दुसरी 50 व्हर्जन. त्याच वेळी, युरोपमध्ये AM ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पात्र होण्यासाठी सोळा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी त्याची कमाल वेग 45 किमी/तापर्यंत मर्यादित असेल.
या बाईकचा स्टॅंडर्ड हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरचा टॉप स्पीड 99 किमी/ताशी असणार आहे. त्याची किंमत सुमारे 24,950 EUR म्हणजेच भारतीय रुपयात 22,79 लाख रुपये असेल.
हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरमध्ये 4.8 kWh बॅटरी पॅक आहे. हे 10 bhp ची कमाल पॉवर आणि 280 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 110 किमी पर्यंतची रेंज देते.