
Autocar Awards 2026 मध्ये 'या' कंपन्यांचा डंका!
या कार्यक्रमात उद्योगातील आघाडीचे विचारवंत, नवोन्मेषक आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वे एकत्र आली होती. मोबिलिटी, अभियांत्रिकी कौशल्य आणि तांत्रिक प्रगतीतील सर्वोत्तम कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला. यंदाच्या वर्षी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टीव्हीएस मोटर कंपनी यांनी सर्वोच्च सन्मान पटकावत भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा उत्सव साजरा केला.
यंदा वाढवण्यात आलेल्या पुरस्कार श्रेणी आणि मान्यवर पाहुण्यांच्या प्रभावी उपस्थितीमुळे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील सामर्थ्य, कल्पकता आणि भविष्याभिमुख दृष्टीकोन ठळकपणे समोर आला. ऑटोकार अवॉर्ड्स 2026 इंडसइंड जनरल इन्शुरन्स (पूर्वी रिलायन्स जनरल इन्शुरन्स) यांच्या वतीने सादर करण्यात आले.
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
या सोहळ्यास कॉस्मो पीपीएफ (प्रीमियम पीपीएफ पार्टनर), भारत पेट्रोलियम – स्पीड (हाय परफॉर्मन्स पेट्रोल पार्टनर) आणि पिरेली (परफॉर्मन्स टायर पार्टनर) यांचे सहकार्य लाभले. तसेच ऑर्बिटसिस (DMS टेक्नॉलॉजी पार्टनर), हॅवेल्स मोट्रॉन (EV चार्जर पार्टनर), टाईम्स नेटवर्क (टेलिकास्ट पार्टनर) आणि लाक्ष्य मीडिया ग्रुप (आउटडोअर मीडिया पार्टनर) यांनीही या भव्य सोहळ्यास मोलाचे योगदान दिले.