Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! GST कपातीनंतर नवीन किंमत फक्त…

येत्या 22 सप्टेंबर 2025 ला वाहनांवर नवीन जीएसटीचे दर लागणार आहेत. यामुळे अनेक वाहनांच्या किमतीत मोठे बदल होणार आहे. चला जाणून घेऊयात, देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारची नवीन किंमत किती असेल.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 11, 2025 | 07:43 PM
देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! (फोटो सौजन्य: @WorldOfCarsIND/X.com)

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! (फोटो सौजन्य: @WorldOfCarsIND/X.com)

Follow Us
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. यातही आता नवीन जीएसटी दरांमुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीत बदल करणार अशी घोषणा केली होती. यानंतर केंद्र सरकारने नवीन GST दरांची घोषणा केली. यानुसार छोट्या वाहनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आली आहे. यामुळे अनेक वाहनांची किंमत कमी झाली आहे.

रेनॉल्ट इंडियाने फेस्टिव्ह सिझनपूर्वीच ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की GST 2.0 कपातीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना दिला जाईल. यानंतर, रेनॉल्टच्या कार्स पूर्वीपेक्षा अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. कंपनीने सांगितले की त्यांच्या वाहनांच्या किमती 96 हजार रुपयांपेक्षा जास्त कमी झाल्या आहेत.

ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त

जीएसटी कपातीनंतर, देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर रेनॉल्ट ट्रायबरच्या किमतीही कमी झाल्या आहेत. जीएसटी कपातीनंतर ही कार आणखी परवडणारी झाली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रेनॉल्ट ट्रायबरच्या किमतीत किती बदल होईल?

रेनॉल्टच्या मते, ट्रायबरच्या सर्व व्हेरिएंटच्या किमती सुमारे 8.5 टक्क्यांनी कमी होतील. सर्वात मोठा फायदा इमोशनल पेट्रोल-ऑटोमॅटिक व्हेरिएंटच्या खरेदीदारांना होईल, ज्याची किंमत आता सुमारे 78,195 रुपयांनी कमी होईल.

7-सीटर असूनही, रेनॉल्ट ट्रायबर कॉम्पॅक्ट आकारात येते, जी शहरांवरील रस्ते आणि महामार्ग दोन्हीसाठी योग्य मानली जाते. सीट्स फोल्ड केल्यानंतर, त्यात 625 लिटरपर्यंत बूट स्पेस मिळते.

रेनॉल्ट ट्रायबरचे फीचर्स

रेनॉल्ट ट्रायबरच्या इंटिरिअरमध्ये सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत. तुम्हाला नवीन ड्युअल-टोन थीम, चांगल्या दर्जाचे मटेरियल फिनिश आणि काही प्रगत फीचर्स पाहायला मिळतील. नवीन ट्रायबरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी फीचर्स दिली जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.

रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्टच्या मेकॅनिकल सेटअपमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. यात आतापर्यंत उपलब्ध असलेले 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन सुमारे 72 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन देखील उपलब्ध असेल, ज्यामुळे हे मॉडेल 7-सीटर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य ठरेल.

Web Title: Renault triber new price after gst reforms 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • GST
  • GST Rate Decrease
  • Renault

संबंधित बातम्या

GST Collection October 2026 : देशाची आर्थिक घोडदौड! GST संकलनाचा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये महसूल 23 % वाढून 2.31 लाख कोटींवर
1

GST Collection October 2026 : देशाची आर्थिक घोडदौड! GST संकलनाचा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये महसूल 23 % वाढून 2.31 लाख कोटींवर

GST Registration Process Simplified : GST नोंदणी आता आणखी सोपी! जाणून घ्या 5 प्रमुख बदल
2

GST Registration Process Simplified : GST नोंदणी आता आणखी सोपी! जाणून घ्या 5 प्रमुख बदल

GST Registration Process Simplified : व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त 3 दिवसांत मिळणार नवीन GST नंबर; झाले 5 मोठे बदल
3

GST Registration Process Simplified : व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त 3 दिवसांत मिळणार नवीन GST नंबर; झाले 5 मोठे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.