फोटो सौजन्य: @lunaXstereo/X.com
नवीन जीएसटी दरांमुळे Hyundai Motors ने त्यांच्या लोकप्रिय सब-4 मीटर एसयूव्ही, Hyundai Venue और Venue N Line च्या किमतीत मोठी कपात केली आहे. सब-4 मीटर एसयूव्हीवरील टॅक्स आता 29-31% वरून 18% पर्यंत कमी झाला आहे, ज्याचा ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. नवीन किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. या कपातीनंतर, व्हेन्यूच्या डिझेल व्हेरिएंटवर 1.32 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल.
Skoda Octavia RS ‘या’ महिन्यात लाँच होण्यास सज्ज, कसे असतील फीचर्स?
Hyundai Venue वर कंपनीने मोठी किंमत कपात केली आहे. नवीन दरांनुसार ग्राहकांना विविध व्हेरिएंट्सवर चांगली बचत मिळणार आहे. उदाहरणार्थ, 1.2 E व्हेरिएंटची किंमत आधी ₹7,94,100 होती, जी आता ₹7,26,381 झाली आहे. त्यामुळे 67,719 रुपयांची बचत होते. त्याचप्रमाणे 1.2 S(O) Turbo DCT व्हेरिएंटवर तब्बल ₹1,01,899 ची बचत मिळते, तर सर्वाधिक बचत 1.5 CRDi SX(O) व्हेरिएंटवर आहे, जिथे जुनी किंमत ₹13,37,600 होती आणि नवीन किंमत ₹12,04,850 आहे, म्हणजेच तब्बल ₹1,32,750 ची बचत. एकूणच, वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार ग्राहकांना ₹67,000 ते ₹1.32 लाखांपर्यंत बचत मिळू शकते, जी कार खरेदीदारांसाठी आकर्षक ठरते. अन्य व्हेरिएंटच्या किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही Hyundai च्या शोरूमला भेट देऊ शकतात.






