फोटो सौजन्य: @HitchcocksM (X.com)
भारतीय मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे देशात अनेक असा दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट बाईक्स ऑफर करत असतात. पण आजही मार्केटमध्ये एकाच कंपनीच्या बाईक्सची जोरदार चर्चा पाहायला मिळते. ती कंपनी म्हणजे रॉयल एन्फिल्ड.
आज प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की आपल्याकडे रॉयल एन्फिल्डची दमदार बाईक असावी. ग्राहकांमध्ये असणारी हीच क्रेझ पाहता रॉयल एन्फिल्डने मार्केटमध्ये बेस्ट बाईक्स ऑफर केल्या आहेत. Royal Enfield Classic 350 ही त्यातीलच एक. नुकतेच ही बाईक नेपाळमध्ये सुद्धा ऑफर करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक की पेट्रोल, रोजच्या वापरासाठी कोणता इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल बेस्ट?
रॉयल एनफिल्डने नेपाळमध्ये त्यांच्या आयकॉनिक बाईक क्लासिक 350 चे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. आता ही बाईक पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश, पॉवरफुल आणि फीचर्सने सुसज्ज झाली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत ही 5.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही नवीन क्लासिक 350 ही रॉयल एनफील्डच्या नेपाळमधील CKDप्लांटमधून बाजारात आणली जाईल. ही बाईक आता अनेक नवीन फीचर्ससह आली आहे.
या बाईकमध्ये ड्युअल-चॅनेल ABS,LED हेडलाइट्स आणि पायलट लॅम्प, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, गिअर पोझिशन इंडिकेटर अशी फीचर्स आहेत.
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 च्या विविध व्हेरियंटच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत. हेरिटेज व्हेरियंट (मद्रास रेड, जोधपूर ब्लू) ची किंमत 555,000 आहे, तर हेरिटेज प्रीमियम व्हेरियंट (मेडलियन ब्रॉन्झ) 5,66,000 ला उपलब्ध आहे. सिग्नल केलेले व्हेरियंट (कमांडो ग्रीन) याची किंमत ₹5,66,000 इतकी आहे. डार्क व्हेरियंट (गन ग्रे, स्टेल्थ ब्लॅक) 5 ,73,000 मध्ये तर क्रोम व्हेरियंट (Emerald) ₹579,900 मध्ये उपलब्ध आहे. या सर्व किंमती NPR-MRP* (एक्स-शोरूम) प्रमाणे आहेत.
Porsche India कडून कार्सच्या किमतीत 15 लाखांपर्यंतची भरमसाट वाढ ! आता ग्राहकांचा खिसाच फाटणार
ही बाईक ५ व्हेरियंटमध्ये आणि 7 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. त्याच्या हेरिटेज व्हेरियंटमध्ये मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू रंगात क्लासिक गोल्डन पिनस्ट्रिपिंग आहे. तर हेरिटेज प्रीमियममध्ये, मेडलियन ब्रॉन्झ रंगात ड्युअल-टोन आणि रेट्रो फिनिश दिसून येते. त्याचप्रमाणे, सिग्नल्स व्हेरियंट कमांडो सँड भारतीय सैन्यापासून प्रेरित असल्याचे दिसते.
त्रिवेणी ग्रुपसोबत पार्टनरशिपमध्ये रॉयल एनफील्ड 2023 मध्ये नेपाळमध्ये बिरगंज येथे त्यांचे CKD युनिट सुरू करेल. आता कंपनी दरवर्षी येथून सुमारे 20,000 बाईक असेंबल करू शकते. यामुळे नेपाळी ग्राहकांना लोकल सपोर्ट तर मिळेलच पण त्याचबरोबर बाईकच्या किमतीही नियंत्रणात राहतील.