
Royal Enfield
नव्या कॉन्टिनेंटल GT650 बाईकच्या लुकमध्ये वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. कंपनी काही नवीन रंगांचे पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. ज्यामुळे बाईकच्या लूक हटके आणि स्टायलिश दिसेल. शिवाय सस्पेंशन सेटअपमध्येही सुधारणा केली जाऊ शकते. समोरील टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला असलेल्या ड्युअल शॉक अॅब्झॉर्बर्सला अधिक प्रीमियम सस्पेंशन युनिटमध्ये बदलण्यात येणार आहे. त्यासोबतच बाजुला ट्विन-डिस्क ब्रेक सेटअपही बाईकला वेगळा लूक देऊ शकतात.
या मॉडेलमधील फीचर्स देखाव्यासाठी नाही तर बाईकला सपोर्टीव काम करतात. डिजिटल एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर महत्त्वाची माहिती साफ दाखवते. स्विचगियर आणि सुधारित लाइटिंग रात्रीच्या राइटला सोयीस्कर बनवते. फीचर्सची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.
शहरातील गर्दीतून प्रवास करण्यासाठी किंवा सहज राईडसाठी, Hunter 350 प्रत्येक प्रवासासाठी बेस्ट आहे. Hunter350 ची सीट उंच आणि सरळ राइडिंग पोजिशन असल्याने ट्रैफिकमध्ये आत्मविश्वास देते. सस्पेंशनला भारतातील रस्त्यांच्या हिशोबानी तयार केलं आहे. ज्यामुळे खड्डे आणि खराब रस्ते यांच्यामुळे लागणारे झटक्यांची तिव्रता कमी होईल. ही बाईक वजनाने हलकी आणि संतुलित असल्याने वळवण्यासाठी आणि पार्किंगच्या वेळी सोयीची ठरेल. ज्याचा फायदा नवीन राइडर्सनाही होणार आहे.
बाईकच्या माइलेजबाबत हंटर 350 कोणतेही मोठे दाव करत नाही. सामान्य राइडिंगमध्ये मीडिया माईलेज संतोषजनक असेल. शिवाय, ब्रँडचं मजबूत आणि सोयीचं सर्व्हिस नेटवर्क त्याबरोबर सहजतेने मिळणारे स्पेयर पार्ट्स त्यामुळे ही बाईक लाँगटर्म विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सोयीचा पर्याय ठरतो.
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप