
किंमत आणि इंजिनमध्ये मोठा फरक
हिमालयन 440 मध्ये 443cc सिंगल-सिलेंडर एअर/ऑइल-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 25.4 bhp पॉवर आणि 34 Nm टॉर्क तयार करते. त्यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तुलनेत हिमालयन 450 मध्ये 452cc लिक्विड-कूल्ड Sherpa इंजिन असून ते 39.47 bhp आणि 40 Nm टॉर्क देते. त्यामुळे हायवे किंवा चढाच्या रस्त्यांवर 450 अधिक दमदार कामगिरी करू शकते.
Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती
सस्पेंशन आणि ऑफ-रोड क्षमता
दोन्ही बाइक्समध्ये अॅडव्हेंचर राइडिंग लक्षात घेऊन लांब सस्पेंशन सेटअप आणि 21-इंच फ्रंट व्हील देण्यात आले आहे. हिमालयन 450 मध्ये 43mm USD फ्रंट फोर्क, लिंक्ड मोनोशॉक आणि 230mm ग्राउंड क्लीअरन्स मिळतो. पुढील आणि मागील बाजूस 200mm सस्पेंशन ट्रॅव्हल असल्याने कठीण ऑफ-रोड मार्गांवर तिची क्षमता जास्त आहे. हिमालयन 440 मध्ये तुलनेने साधे टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक सेटअप आहे.
फीचर्समध्ये कोणती पुढे?
हिमालयन 440 मध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED हेडलॅम्प आणि ट्रिपर नेव्हिगेशनसारखे आवश्यक फीचर्स मिळतात. दुसरीकडे हिमालयन 450 मध्ये 4-इंच TFT डिस्प्ले, फुल-मॅप नेव्हिगेशन, फोन कनेक्टिव्हिटी, राइड-बाय-वायर आणि 4 राइडिंग मोड्स आहेत. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या बाबतीत 450 स्पष्टपणे पुढे आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय
कोणती बाइक तुमच्यासाठी योग्य?
कमी बजेट, साधी रचना आणि शहरासोबत हलकी टूरिंग करायची असल्यास हिमालयन 440 आकर्षक पर्याय ठरते. मात्र लांब पल्ल्याच्या टूरिंगसोबत कठीण ऑफ-रोडिंग, जास्त पॉवर आणि आधुनिक फीचर्स हवे असतील तर हिमालयन 450साठी जास्त खर्च करणे योग्य ठरू शकते.