Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्डचा जलवा! पहिल्या तिमाहीत पुन्हा ओलांडला ३ लाख विक्रीचा टप्पा; 350cc बाईक्सचा दबदबा कायम

रॉयल एनफील्डने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ३,०१,१७४ दुचाकींची विक्री करत ३२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली आहे. यात क्लासिक, बुलेट, हंटर आणि मिटिओर या ३५० सीसी बाइक्सचा सर्वाधिक ९३ टक्के वाटा राहिला असून कंपनी यंदा १२ लाखांहून अधिक विक्रीचा नवा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 23, 2026 | 04:37 PM
रॉयल एनफिल्डचा जलवा! पहिल्या तिमाहीत पुन्हा ओलांडला ३ लाख विक्रीचा टप्पा; 350cc बाईक्सचा दबदबा कायम
Follow Us
Follow Us:
  •  रॉयल एनफील्डने FY27 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे  एप्रिल-जून २०२६मध्ये ३,०१,१७४ बाइक्स विकल्या; गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२% वाढ झाली.
  • एकूण विक्रीत क्लासिक, बुलेट, हंटर आणि मिटिओरचा ९३% वाटा असून, संपूर्ण ३५० सीसी सेगमेंटवर ८५% कब्जा मिळवला.
  • चालू आर्थिक वर्षात विक्री १२ लाखांहून अधिक होण्याचा अंदाज असून, कंपनी लवकरच ४५०cc, ६५०cc, ७५०cc आणि EV मॉडेल्स लाँच करणार आहे.

रॉयल एनफील्डने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२६) उत्तम कामगिरी करत ३,०१,१७४ दुचाकींची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत झालेल्या २,२८,७७९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी तिमाही विक्री ठरली असून, याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान ३,००,४२६ युनिट्सची विक्री झाली होती.

बाईकची सीट मॉडीफाय करायची आहे? या आहेत काही बेस्ट आयडिया आणि जरुरी गोष्टी

३५० सीसी सेगमेंटवर ५० टक्क्यांहून अधिक वर्चस्व

कंपनीच्या एकूण विक्रीत ३५० सीसी इंजिन असलेल्या दुचाकींचा वाटा सर्वाधिक म्हणजेच तब्बल ९३ टक्के राहिला आहे. क्लासिक ३५०, बुलेट ३५०, हंटर ३५० आणि मिटिओर ३५० या चार मॉडेल्सची मिळून २,८०,१३६ युनिट्स विक्री झाली. यासह संपूर्ण देशातील ३५० सीसी बाइक सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डने ८५ टक्के बाजारावर कब्जा मिळवला आहे. याच सेगमेंटमध्ये बजाज ऑटो ७ टक्के म्हणजे २३,८४४ युनिट्स, होंडा ६ टक्के म्हणजे १८,२४८ युनिट्स आणि टीव्हीएस मोटार उर्वरित २ टक्के बाजारासह खूप मागे राहिल्या आहेत.

४५० सीसी आणि मध्यम वजनाच्या बाइक्समध्येही अग्रस्थान

३५० ते ५०० सीसी श्रेणीमध्ये देखील रॉयल एनफील्डचे वर्चस्व कायम आहे. कंपनीच्या गुरिल्ला ४५० आणि हिमालयन ४५० या दोन बाइक्सची मिळून ९,८८३ युनिट्स विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या श्रेणीतील एकूण विक्रीत या दोन बाइक्सचा ५९ टक्के वाटा आहे. तसेच ५०० ते ८०० सीसी सेगमेंटमध्ये ११,१५५ बाइक्सची विक्री झाली असून, या श्रेणीमध्ये वार्षिक विक्रीत ९ टक्क्यांची घसरण झाली असली तरी ९७ टक्के बाजारावर रॉयल एनफील्डचेच नियंत्रण आहे, असे म्हणायला हरकत नाही.

गाडी चालवताना बॅटरी नेमकी कशी चार्ज होते? जाणून घ्या सोप्या भाषेत

नवीन वार्षिक विक्रमाकडे वाटचाल

एप्रिल ते जून या तिमाहीतील कामगिरी पाहता रॉयल एनफील्ड चालू आर्थिक वर्षात पुन्हा एकदा नवीन वार्षिक विक्रम नोंदवण्याच्या मार्गावर आहे. चालू आर्थिक वर्षात भारतातील एकूण विक्री १२ लाख युनिट्सचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष २०२६ मधील ११,०७,३४३ युनिट्सच्या विक्रमी विक्रीला मागे टाकेल. आगामी काळात कंपनी ४५० सीसी, ६५० सीसी, ७५० सीसी आणि इलेक्ट्रिक मध्ये अनेक नवीन मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहे.

 

Web Title: Royal enfield sales hike of three lakhs in fy27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.