Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडचा किंग खान नेहमीआलिशान गोष्टींसाठी चांगलाच चर्चेत असतो. आलिशान शब्द आला म्हणजे तिथे गाड्यांच्या चर्चा तर होणारच ना! शाहरुख खानच्या ताफ्यात बरीच आलिशान गाड्या आहेत. आता या ताफ्यात अशा एका नावाचा समावेश झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 03:16 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Mercedes-Benz V-Class ही शाहरुख खानने नुकतीच खरेदी केली
  • दीड कोटींपेक्षा जास्त महागडी कार
  • किंग खानच्या नव्या लक्झरी व्हॅनमधले फीचर्स 
Shah Rukh Khan Buys new Mercedes Benz V Class: बॉलिवूडचा किंग खान नेहमी त्याच्या आलिशान गोष्टींसाठी चांगलाच चर्चेत असतो. आलिशान शब्द आला म्हणजे तिथे गाड्यांच्या चर्चा तर होणारच ना! शाहरुख खानच्या ताफ्यात बरीच आलिशान गाड्या आहेत. आता या ताफ्यात अशा एका नावाचा समावेश झाला आहे, ज्याची त्यांची पत्नी गौरी खान बऱ्याच काळापासून चाहती आहे. ती या गाडीची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहे. अलीकडेच या लक्झरी कारच्या लाँचिंगच्या कार्यक्रमाला गौरी खान उपस्थित होती. Mercedes-Benz V-Class ही शाहरुख खानने नुकतीच खरेदी केली आहे. ही लक्झरी व्हॅन शाहरुख आणि गौरी यांच्यासाठी एका ‘प्रायव्हेट सूट’प्रमाणे काम करणार आहे. काय आहे या लक्झरीयस कारमध्ये खास ?

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन

दीड कोटींपेक्षा जास्त महागडी कार

शाहरुख आणि गौरी खान यांनी ओब्सिडियन ब्लॅक रंगाची चमकणारी नवीन  Mercedes-Benz V-Class कार खरेदी केली आहे. त्यांना त्यांच्या गरजेनुसार यात बरेच बदल करुन घेतले आहेत. ज्यामुळे या लक्झरी व्हॅनची किंमत दीड कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. अलीकडेच क्रिकेटर हार्दिक पांड्याने सुद्धा आपल्या गर्लफ्रेंड महीका शर्माला देखील ही लक्झरी व्हॅन खरेदी करुन दिली होती. त्या कारचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर किंग खानने खरेदी केल्याने ही नवीन व्हॅन त्याच्या घराच्या परिसरात दिसली आहे.

किंग खानच्या नव्या लक्झरी व्हॅनमधले फीचर्स

शाहरुखच्या या नवीनMercedes-Benz V-Class च्या फिचर्सबाबत बोलायचं तर याचं इंजिन पॉवरफूल आहे. यामध्ये २.० लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे २३१ PS पॉवर आणि ३७० Nm टॉर्क जनरेट करते. तसंच यामध्ये ९G-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही देण्यात आलं आहे. याच्या डिझाइनमध्ये काही खास गोष्ट आहे. बिझनेस मीटिंग आणि फॅमिली टूरिंगसाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून या car कडे पाहिलं जात आहे. ही व्हॅन ५.४ मीटर लांब असून यामध्ये ६-सीटर लेआउट मिळतो. ही कार आधुनिक फीचर्सनेही सुसज्ज आहे. यामध्ये १९ इंची डायमंड कट अलॉय व्हील्स, प्रीमियम इंटिरिअर, मसाज सुविधेसह व्हेंटिलेटेड सीट्स, लुगानो लेदर अपहोल्स्ट्री, इन्फोटेनमेंटसाठी १२.३ इंची स्क्रीन, प्रीमियम साउंड सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा आणि ‘लेव्हल २’ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखी प्रगत फीचर्स यात दिली गेली आहेत.

शाहरुख खानचे लक्झरी कार कलेक्शन

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शाहरुख खानकडे एकापेक्षा एक सरस आलिशान गाड्या आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये १२ कोटींची Bugatti Veyron,  ११ कोटींची Rolls Royce Cullinan, याशिवाय बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बीएमडब्ल्यू i8, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, रेंज रोव्हर वोग   बीएमडब्ल्यू ७ सिरीज आणि टोयोटा लँड क्रूझर यांसारख्या अत्यंत महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

फक्त 3 मिनिटांत रिक्षाच बनेल स्कूटर! Hero कंपनीचं भन्नाट ‘इनोव्हेशन’; सरकारनेही दिला हिरवा सिग्नल

Web Title: Shah rukh khan and gauri khan buys new mercedes benz v class to show up more luxury and spacious van see feature marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • king shahrukh khan
  • Mercedes
  • Mercedes car
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
1

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य
2

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ
3

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
4

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.