
भारतीय ई-व्हीकल उत्पादक कंपनी Simple Energy भारतीय बाजारात २ सप्टेंबर २०२६ रोजी आपला नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये याचे नाव ‘Arrive’ असेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र कंपनीने या स्कूटरचे अधिकृत नाव ‘Simple Wave’ असल्याचे स्पष्ट केले आहे. ही स्कूटर बाजारात थेट Ather Rizta, TVS iQube आणि Yamaha EC06 यांसारख्या लोकप्रिय कौटुंबिक स्कूटरशी स्पर्धा करेल.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि डिझाइन
TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
बॅटरी, रेंज आणि अपेक्षित किंमत कंपनीने अद्याप या स्कूटरच्या तांत्रिक बाबी अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत, परंतु ही Simple Energy ची आतापर्यंतची सर्वात परवडणारी स्कूटर असणार आहे.
TVS Apache RTR 160 2V मध्ये मिळतायत हे भन्नाट फीचर्स! शोरूमला जाण्यापूर्वी नक्की जाणून घ्या!
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Simple One (५ kWh बॅटरी, २६५ किमी रेंज), OneS (३.७ kWh बॅटरी, १९० किमी रेंज) आणि Ultra (६.५ kWh बॅटरी, ४०० किमी रेंज) या मॉडेल्सच्या तुलनेत नवीन ‘Wave’ स्कूटर रोजच्या व्यावहारिक वापरासाठी उत्तम पर्याय ठरेल.