
फोटो सौजन्य: Pinterest
स्कोडा भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये येणाऱ्या Skoda Kylaq ची किंमत देखील वाढली आहे. सध्या याचे कोणते व्हेरिएंट कोणत्या किमतीत उपलब्ध आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.
Volkswagen ने ग्राहकांचं ऐकलं! जानेवारी 2026 मध्ये जाहीर केले ‘या’ Cars वर धुवाधार ऑफर्स
स्कोडा भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्कोडा कायलॅक ऑफर करते. जानेवारी 2026 मध्ये, कंपनीने यांच्या किमती वाढवल्या आहेत.
रिपोर्टनुसार, या एसयूव्हीची किंमत 19 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या एसयूव्हीची किंमत वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार वाढवण्यात आली आहे. तसेच या नव्या किमती तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत.
कंपनीने क्लासिकला बेस व्हेरिएंट म्हणून ऑफर केले आहे. या व्हेरिएंटची किंमत 4 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. वाढीपूर्वी ही किंमत 7.55 लाखांना उपलब्ध होती, परंतु आता याची एक्स-शोरूम किंमत 7.59 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Kia Seltos चा बाजारात धमाका! १०.९९ लाखांत लाँच झाली ऑल-न्यू जनरेशन SUV; पाहा जबरदस्त फीचर्स
Prestige ही कायलॅकची टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट म्हणून ऑफर केली जाते. या व्हेरिएंटच्या किमतीत 19 हजार रुपयांची सर्वात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी ही किंमत 12.80 लाखांपर्यंत होती, परंतु आता याची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये करण्यात आली आहे.
एसयूव्हीच्या इतर व्हेरिएंटसह Signature एसयूव्हीची किंमत 10000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. प्रेस्टिज 1.0 व्हेरिएंटची किंमत 15 हजार रुपये, सिग्नेचर 1.0 एटीची किंमत 10000 रुपये आणि सिग्नेचर प्लस 1.0 एटीची किंमत देखील 10 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
स्कोडा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये कायलॅक ऑफर करते. या सेगमेंटमध्ये, ती Maruti Suzuki Brezza, Tata Nexon, Mahindra XUV 3XO, Hyundai Venue, Kia Sonet, Kia Syros सारख्या SUV शी स्पर्धा करते.