फोटो सौजन्य: iStock
ग्राहक नेहमीच कार खरेदी करताना कारची किंमत आणि त्यावरील डिस्काउंटवर लक्ष देत असतात. जर तुम्हीही अशाच डिस्कॉऊंटच्या शोधात असाल तर Volkswagen त्यांच्या कारवर जानेवारी 2025 मध्ये दमदार डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत! केव्हा होणार लाँच? जाणून घ्या
कंपनी मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये Taigun ऑफर करते. जर तुम्ही जानेवारी 2026 मध्ये ही एसयूव्ही खरेदी केली तर तुम्ही 1.04 लाखांपर्यंत बचत करू शकता. फोक्सवॅगनकडून ही ऑफर या एसयूव्हीच्या Comfortline व्हेरिएंटवर दिली जात आहे. यांच्या टॉप व्हेरिएंट, Highline Plus AT, या महिन्यात अनुक्रमे 1 लाख आणि GT Line AT 80 हजार रुपयांपर्यंत बचत देते. ही ऑफर या एसयूव्हीच्या 1-लिटर इंजिन व्हेरिएंटवर उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, 1.5 -लिटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटवर 50000 रुपयांपर्यंत बचत करता येते. या एसयूव्हीची किंमत 11.42 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 19.19 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.
फोक्सवॅगन मिड साइझ सेडान सेगमेंटमध्ये Virtus ऑफर केली जाते. अहवालांनुसार, Comfortline MT व्हेरिएंटवर 1.26 लाख, रुपये, Highline AT व्हेरिएंटवर 1 लाख आणि GT Line AT व्हेरिएंटवर 80000 रुपयांचे बचत उपलब्ध आहे. 1.5 -लिटर जीटी प्लस क्रोम डीएसजी आणि जीटी प्लस स्पोर्ट डीएसजी व्हेरिएंटवर 30 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11्.20 लाखांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंट 18.78 लाखांपर्यंत जाते.
Mahindra XUV 7XO की Tata Safari इंजिन, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत कोणती एसयूव्ही चांगली?
अहवालांनुसार, ही ऑफर फक्त 2025 मध्ये उत्पादित केलेल्या युनिट्सवर उपलब्ध आहे. ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बोनस, लॉयल्टी बोनस आणि स्क्रॅपपेज बोनस यांचा समावेश आहे.






