Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Electric SUV: 600km रेंजसह लाँच होणार नवीन 7-सीटर EV, ‘हे’ आहेत दमदार लक्झरी फीचर्स

Skoda Auto आता आपली सर्वात मोठी इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जिचे नाव Skoda Peaq असण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या या वाहनाची पडताळणी करत असून, येत्या काही महिन्यांत ते ग्लोबल मार्केटमध्ये उतरवण्याची शक्यता

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 07:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Skoda Auto सर्वात मोठी इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याच्या तयारीत
  • नाव Skoda Peaq असण्याची शक्यता
  • याचे दमदार फीचर्स तुम्हालाही प्रेमात पाडतील
Skoda Peaq Electric SUV: Skoda Auto आता आपली सर्वात मोठी इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जिचे नाव Skoda Peaq असण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या या वाहनाची पडताळणी करत असून, येत्या काही महिन्यांत ते ग्लोबल मार्केटमध्ये उतरवण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेसाठी लॉन्चची तारीख अद्याप समोर आलेली नाही. जे लोकं कुटुंबासोबत वारंवार प्रवास करतात ज्यांना लांब पल्ल्याचा प्रवास आवडतो अशांसाठी ही SUV विशेषतः डिझाइन केली आहे. पण याचे दमदार फीचर्स तुम्हालाही प्रेमात पडायला भाग पाडतील.

Tata Sierra चा नवा अंदाज! ‘या’ दिवशी होणार ग्रँड एन्ट्री; पाहा काय आहेत फिचर्स ?

मोठे आकारमान आणि शानदार स्पेस

Skoda Peaq चा आकार फार मोठा असण्याची शक्यता आहे. तिची लांबी अंदाजे ४.९ मीटर आणि उंची सुमारे १.७ मीटर असू शकते. तिचा व्हीलबेस जवळपास ३ मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केबिन अत्यंत प्रशस्त आणि सविस्तर असेल. या SUV मधील प्रवाशांना विशेष आणि सविस्तर जागा दिलेली आहे. ज्यामुळे पायांसाठी आणि डोक्यासाठी पुरेशी जागा मिळते. ज्यामुळे लांबचा प्रवासही आरामदायी होतो. बूट स्पेसच्या बाबतीत बोलायचं तर ७-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये अंदाजे ३०० लिटरची कार्गोची क्षमता मिळते, जी सीटची तिसऱ्या नंबरची रो फोल्ड केल्यानंतर जवळपास १,००० लिटरपर्यंत वाढू शकते.

मॉडर्न लुक आणि स्टायलिश डिझाइन

Skoda Peaq चे डिझाइन अत्यंत आधुनिक आणि आकर्षक असणार आहे. फ्रंट फेशिया ग्लॉसी ब्लॅक पॅनल आणि वर्डिकल डिजाइन असणार आहे. यालाच सोईची अशी फुल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स आहेत, जे गाडीला एक प्रीमियम आणि अत्याधुनिक लुक देतात. ही एसयूव्ही १९ ते २१ इंचांच्या मोठ्या अलॉय व्हील्सने सुसज्ज असेल. ज्यामुळे रस्त्यावर ती इतरांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे उठून दिसेल. डोअर हँडल्स आणि मागील बाजूस असलेले कनेक्टेड एलईडी टेललाइट्स तिच्या लूकला कॉम्पिमेंट देण्यासाठी परफेक्ट ठरतील.

लक्झरी फीचर्स आणि एडवांस टेक्नोलॉजी

या SUV चा इंटिरियर अत्यंत प्रीमियम असणार आहे एवढं मात्र नक्की. यामध्ये अॅम्बियंट लायटिंग, हीटेड स्टीयरिंग व्हील, मसाज फंक्शन असलेल्या सीट्स आणि अॅडजस्टेबल लेग सपोर्ट यांसारख्या अनेक लक्झरी फीचर्सचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त, केबिनमध्ये एक मोठी १३.६-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १०-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्ले असेल. पॅनोरॅमिक सनरूफ आणि मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टीममुळे केबिनमधील निवांत आणि आरामदायीपणा आणखीनच वाढवेल. सुरक्षेसाठी या कारमध्ये अनेक एअरबॅग्ज, ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आणि इतर विविध आवश्यक ते फिचर्स देण्यात आले आहेत

शक्तिशाली बॅटरी आणि लांब पल्ला

Skoda Peaq मध्ये अंदाजे ८० kWh पर्यंत क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. एकाच चार्जवर ६०० किलोमीटरहून अधिक पल्ला गाठण्याची क्षमता यात आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. हे वाहन एका शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असेल, जी १५० kW ते २२० kW दरम्यान वीज निर्माण करण्यास सक्षम आहे. ही SUV अवघ्या ६.७ सेकंदांत ० ते १०० किमी/तास इतका वेग गाठू शकते. जलद चार्जिंगच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, DC चार्जरचा वापर करून हे वाहन अवघ्या ३० मिनिटांत ८०% पर्यंत चार्ज करता येते.

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…

Web Title: Skoda new 7 seater electric suv peaq set to launch soon check details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • best suv cars
  • Skoda Auto
  • SUV
  • SUV cars

संबंधित बातम्या

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!
1

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या
2

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री
3

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.