फोटो सौजन्य: @GaadiKey(X.com)
दुचाकी चालवताना हेल्मेट किती महत्वाचे आहे, हे तर आपण जाणतोच. मात्र, यासोबतच ते हेल्मेट उत्तम क्वालिटीचे सुद्धा असणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये हल्ली अनेक हेल्मेट पाहायला मिळतात. यात कोणते हेल्मेट निवडावे याबाबत अनेकदा रायडर्स गोंधळले असतात. मात्र, जर तुम्ही सुपरमॅन लव्हर असाल तर मग तुमच्यासाठी Studds चा Superman Edition परफ़ेक्ट पर्याय ठरेल.
देशात दरमहा लाखो रस्ते अपघात होत असतात. या अपघातांमध्ये सर्वाधिक फटका दुचाकी वाहनचालकांना बसतो. दुचाकीस्वारांशी संबंधित बहुतेक अपघात हेल्मेट न घातल्यामुळे होतात. असे अपघात कमी करण्यासाठी, आघाडीच्या हेल्मेट उत्पादक स्टड्सने एक नवीन हेल्मेट लाँच केले आहे. चला जाणून घेऊयात, Helios Superman Edition नावाचे हेल्मेट कोणत्या प्रकारच्या फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे.
GST कमी झाल्याने ‘ही’ एसयूव्ही झाली एकदमच स्वस्त, किंमत 1.55 लाख रुपयांनी झाली कमी
स्टड्सने भारतात एक नवीन हेल्मेट लाँच केला आहे. कंपनीने Helios Superman Edition सादर केले आहे, ज्यामध्ये सुपरमॅनची इमेज आणि ग्राफिक्स आहेत. स्टड्सने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्स इंडियाच्या सहकार्याने हे हेल्मेट सादर केले आहे.
कंपनीकडून सादर केलेला हा एक फुल-फेस हेल्मेट आहे. यात ॲण्टी-फॉग 100 लेन्सची सुविधा देण्यात आली असून ती 100 सेकंदांपर्यंत धुक्यापासून बचाव करते. याशिवाय उत्तम वायुविजनसाठी विशेष सोय केलेली आहे. हा हेल्मेट अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की त्यामध्ये ब्लूटूथ सहजपणे लावता येतो. या हेल्मेटला सुपरमॅन ऑफ स्टीलचे आकर्षक ग्राफिक्स देण्यात आले आहेत आणि तो सहा वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
स्टड्सकडून या हेल्मेटचे उत्पादन थर्मोप्लास्टिक पॉलिमरच्या साहाय्याने करण्यात आले आहे, ज्यामुळे वापरणाऱ्याला बाहेरील धक्के आणि अपघाती टक्करीपासून सुरक्षा मिळते. यामध्ये EPS मटेरियलचाही वापर करण्यात आला आहे. या हेल्मेटला BIS आणि DoT कडून प्रमाणपत्र मिळालेले आहे.
स्टड्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भूषण खुराना म्हणाले, “स्टड्समध्ये आमचे ध्येय नेहमीच प्रत्येक हेल्मेटमध्ये सुरक्षा, नावीन्य आणि स्टाइलचा कॉम्बिनेशन घडवण्याचे राहिले आहे. हेलिओस सुपरमॅन एडिशन हे याच विचाराचे प्रतिक आहे. हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करते, आजच्या रायडर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित सुपरहिरोंपैकी एकाकडून प्रेरित आहे.”
कंपनीने हे हेल्मेट 3700 च्या किमतीत लाँच केले आहे. हे मध्यम, मोठे आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.