Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Grover कडून Land Rover Defender 130 खरेदी, कारच्या किमतीत मुंबईत फ्लॅट घ्याल

बॉलिवूड अभिनेता सुनील ग्रोव्हरने आलिशान Land Rover Defender 130 खरेदी केली आहे. चला या कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2026 | 06:55 PM
Sunil Grover कडून Land Rover Defender 130 खरेदी

Sunil Grover कडून Land Rover Defender 130 खरेदी

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता सुनील ग्रोव्हरकडून आलिशान कार खरेदी
  • Land Rover Defender 130 असे या कारचे नाव
  • जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन Sunil Grover अलीकडेच त्याच्या नवीन Land Rover Defender 130 सोबत स्पॉट झाला आहे. डिफेंडर लाइनअपमधील ही सर्वात लांब एसयूव्ही असून ऑन-रोड किंमत जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. लक्झरी आणि दमदार कार्सचे शौकीन असलेल्या सुनील ग्रोव्हर यांची ही नवी एसयूव्ही तिच्या आकर्षक डिझाइन आणि फीचर्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लक्झरीसोबतच उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमता हवी असणाऱ्यांसाठी Defender 130 एक खास पर्याय मानला जातो.

किती आहे किंमत?

Land Rover Defender 130 च्या विविध व्हेरिएंट्सची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.41 कोटी रुपयांपासून सुरू होऊन 1.82 कोटी रुपयांपर्यंत जाते. शहरानुसार ऑन-रोड किंमत जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. सुनील ग्रोव्हर सॅन्टोरिनी ब्लॅक रंगातील Defender 130 मध्ये दिसला आहे, जी अत्यंत आकर्षक आणि दमदार रोड प्रेझेन्स असलेली एसयूव्ही आहे.

लाडकी Hyundai Creta एका क्षणार्धात होईल तुमची! जाणून घ्या Down Payment आणि एमी

सर्वात लांब डिफेंडर आणि त्यासोबत जबरदस्त लुक

Defender 130 ची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे याची लांबी. कंपनीने तिला Defender 110 पेक्षा 340 मिमीने अधिक लांब बनवले आहे, ज्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा उपलब्ध होते. यामध्ये राऊंड एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, मजबूत बोनट, एलईडी टेललाइट्स आणि मागील दरवाजावर फुल-साइज स्पेअर व्हील देण्यात आले आहे. 290 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 900 मिमीपर्यंत पाण्यातून चालण्याची क्षमता यामुळे ही खरी ऑफ-रोड एसयूव्ही ठरते.

फीचर्स आणि केबिन स्पेस

Defender 130 ही 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून 2+3+3 सीटिंग लेआउट मिळतो. तिसऱ्या रांगेतही आरामदायी बसण्याची सोय आहे. यात 11.4 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, मेरिडियन साउंड सिस्टम, 3-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग्ससारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. या एसयूव्हीला Euro NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाली आहे. बूट स्पेस 389 लिटर असून सीट्स फोल्ड केल्यास ती 2,516 लिटरपर्यंत वाढवता येते.

Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyota Hyryder लाँच होण्याची शक्यता

दमदार इंजिन पर्याय

Defender 130 मध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.

  • 3.0 लिटर डिझेल इंजिन: 296 बीएचपी पॉवर आणि 650 एनएम टॉर्क
  • 3.0 लिटर पेट्रोल इंजिन: 394 बीएचपी पॉवर आणि 550 एनएम टॉर्क
  • 5.0 लिटर V8 पेट्रोल इंजिन: 518 बीएचपीपर्यंत शक्ती
यामध्ये टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टम आणि ऑल-व्हील ड्राइव्हची सुविधा दिली आहे.

सुनील ग्रोव्हर कार कलेक्शन

विशेष म्हणजे, सुनील ग्रोव्हरच्या गॅरेजमध्ये आधीपासूनच Mercedes-Benz CLA 200, Audi Q5 आणि Audi A3 Cabriolet सारख्या लक्झरी गाड्या आहेत. आता Defender 130 त्यांच्या शानदार कलेक्शनमधील आणखी एक दमदार कार ठरली आहे.

Web Title: Sunil grover purchased land rover defender 130 worth rupees 2 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • automobile
  • Jaguar Land Rover
  • Sunil Grover

संबंधित बातम्या

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
1

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?
2

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?

हायफाय टेक्नॉलॉजी आली अंगाशी! चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारमुळे जोरदार राडा; एकाच वेळी थांबल्या 100 पेक्षा अधिक गाड्या
3

हायफाय टेक्नॉलॉजी आली अंगाशी! चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारमुळे जोरदार राडा; एकाच वेळी थांबल्या 100 पेक्षा अधिक गाड्या

Toll Tax New Rule: कार मालकांनोsss जरा इकडे लक्ष द्या! 10 एप्रिल पासून ‘या’ लोकांना टोल नाक्यावर नो एंट्री
4

Toll Tax New Rule: कार मालकांनोsss जरा इकडे लक्ष द्या! 10 एप्रिल पासून ‘या’ लोकांना टोल नाक्यावर नो एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.