फोटो सौजन्य: @VinFastIN/X.com
व्हिएतनाममधील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Vinfast ने भारतीय ऑटो बाजारपेठेत एंट्री मारत आपली सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक SUV Vinfast VF6 लाँच केली आहे. ही मिड-साइज इलेक्ट्रिक SUV असून तिची थेट स्पर्धा Tata Curvv EV, Mahindra BE 6 आणि Hyundai Creta Electric यांसारख्या कारशी होणार आहे. कंपनीने VF6 ला तीन व्हेरिएंट्स – Earth, Wind आणि Wind Infinity मध्ये आणले आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, याची सुरुवातीची किंमत 16.49 लाख (एक्स-शोरूम) रुपये ठेवण्यात आली आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 18.29 लाखांपर्यंत जाते.
VF6 चे डिझाईन तरुणाईला लक्षात घेऊन मॉडर्न पद्धतीने तयार करण्यात आले आहे. यासाठी इटालियन स्टुडिओ Torino Design ने काम केले आहे. ही एक कूपे-स्टाईल SUV असून तिची लांबी 4.2 मीटर आणि व्हीलबेस 2.73 मीटर आहे. क्लोज्ड-ऑफ ग्रिल, वर्टिकल LED हेडलॅम्प्स आणि स्लिक DRLs यामुळे ही कार अधिक आकर्षक दिसते. साईड प्रोफाईलमध्ये स्लोपिंग रूफलाइन, शॉर्ट ओव्हरहॅंग आणि बॉडी क्लॅडिंगमुळे तिला मस्क्युलर लुक मिळतो. इंटिरिअर मिनिमलिस्टिक आणि फ्यूचरिस्टिक लेआउटसह दिले आहे. Earth व्हेरिएंटमध्ये ब्लॅक थीम, तर Wind व Infinity व्हेरिएंटमध्ये मोक्का ब्राउन इंटीरियर मिळते. व्हेगन लेदर सीट्स, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड आणि हीटेड/व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यामुळे ही SUV खास ठरते.
VF6 मध्ये 59.6 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जो फ्रंट-व्हील-ड्राईव्ह मोटरशी जोडलेला आहे. बेस व्हेरिएंट 177 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करतो, तर उच्च व्हेरिएंटमध्ये 204 hp आणि 310 Nm टॉर्क मिळतो. कंपनीनुसार, WLTP सायकलवर VF6 ची रेंज 468–480 किमी, तर ARAI प्रमाणे सुमारे 463 किमी आहे. ही SUV 0-100 kmph फक्त 8.9 सेकंदांत गाठते. चार्जिंगसाठी 11 kW AC होम चार्जर (6-7 तासांत फुल चार्ज) आणि 80 kW DC फास्ट चार्जर (30 मिनिटांत 10-80%) चे पर्याय आहेत. खास म्हणजे, बॅटरीवर कंपनीकडून 10 वर्षे/अनलिमिटेड किमी वॉरंटी दिली जाते.
Vinfast VF6 मध्ये आधुनिक फीचर्सची रेलचेल आहे. यात 12.9-इंच टचस्क्रीन, हेड-अप डिस्प्ले (HUD), वायरलेस Android Auto/Apple CarPlay आणि OTA अपडेट्स दिले आहेत. Earth व्हेरिएंटमध्ये ऑटो LED हेडलॅम्प्स, इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट आणि ग्लास रूफ मिळते. Wind व्हेरिएंटमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ॲम्बिएंट लाईटिंग आणि प्रीमियम साउंड सिस्टम आहेत. तर Infinity व्हेरिएंटमध्ये पॅनोरामिक सनरूफ मिळते. कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीमुळे व्हॉईस कंट्रोल आणि रिमोट मॅनेजमेंट सुविधाही दिल्या आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीतही VF6 मजबूत आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये 7 एअरबॅग्स, ABS, EBD, ESC, हिल-होल्ड असिस्ट आणि 360-डिग्री कॅमेरा स्टँडर्ड दिले आहेत. त्याशिवाय लेव्हल-2 ADAS पॅकेजमध्ये ॲडाप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ट्रॅफिक जॅम असिस्ट समाविष्ट आहे.
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…
Vinfast VF6 ला एकूण 6 कलर ऑप्शन्स – Crimson Red, Desat Silver, Infinity Blank, Jet Black, Urban Mint आणि Zenith Grey मध्ये आणले आहे. भारतीय बाजारात या कारचा थेट सामना Tata Curvv EV, MG ZS EV आणि Hyundai Creta Electric सोबत होणार आहे. किंमत आणि फीचर्स लक्षात घेता, VF6 हा सेगमेंटमधील आकर्षक व किफायतशीर पर्याय ठरू शकतो.
तुलनेत, Tata Curvv EV ची किंमत 17.49–22.24 लाख रुपये, MG ZS EV ची सुरुवातीची किंमत 18.98 लाख रुपये आणि Hyundai Creta Electric 18.02–24.55 लाख रुपयांदरम्यान आहे. लक्षात घ्या या एक्स-शोरूम सर्व किमती आहे.