
फोटो सौजन्य: Pinterest
भारतात अनेक स्कूटर लोकप्रिय आहेत. यातही सुझुकी अॅक्सेस 125 आणि हिरो डेस्टिनी 125 ही भारतातील सर्वात लोकप्रिय 125 सीसी स्कूटरपैकी एक आहेत. हे दोन्ही स्कूटर किंमत, फीचर्स, परफॉर्मन्स आणि दैनंदिन वापराच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करतात.
दोन्ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठी उत्तम आणि इंधन-कार्यक्षम स्कूटर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केल्या आहेत. अॅक्सेस 125 सुधारित परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करते, तर डेस्टिनी 125 नवीन फीचर्ससह स्वतःला परवडणारा पर्याय म्हणून ग्राहकांसमोर येते. चला या दोन्ही स्कूटरची तुलना करून पाहुयात.
याच 5 कारणांमुळे प्रत्येक महिन्यात Maruti Suzuki Ertiga विक्रीत झेंडे रोवतेच!
सुझुकी अॅक्सेस चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याच्या एक्स-शोरूम किमती बेस व्हर्जनसाठी 77,684 ते टॉप-ऑफ-द-लाइन व्हर्जनसाठी 93,877 पर्यंत आहेत. दरम्यान, हिरो डेस्टिनीची किंमत 83,997 ते 84,919 पर्यंत आहे. या दोन्ही एक्स-शोरूम किमती आहेत.
Suzuki Access 125 मध्ये 124 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे सुमारे 8.31 हॉर्सपॉवर आणि 10.2 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, Hero Destini 125 मध्ये 124.6 cc एअर-कूल्ड इंजिन असून ते सुमारे 9 हॉर्सपॉवर आणि 10.4 Nm टॉर्क जनरेट करते. त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत Destini 125 थोडीशी पुढे आहे. दोन्ही स्कूटरमध्ये CVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीने दोन्ही स्कूटर जवळपास समान परफॉर्म करतात. Access 125 चे दावा केलेले मायलेज सुमारे 45 km/l आहे, तर Hero Destini 125 सुमारे 60 km/l मायलेज देण्याचा दावा करते.
अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्समुळे ‘हा’ प्रीमियम हेल्मेट चर्चेत! अपेक्षित किंमत 17,000 ते 20,000 रुपये
Suzuki Access 125 मध्ये ब्लूटूथ-सपोर्ट असलेले डिजिटल-अनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बाह्य फ्युएल फिलर कॅप, USB चार्जिंग यांसारख्या सुविधा मिळतात. तसेच निवडक व्हेरिएंट्समध्ये Suzuki Ride Connect फिचरही देण्यात आले आहे.
तर Hero Destini 125 मध्ये सेमी-डिजिटल कन्सोल, मोबाइल चार्जिंग पोर्ट, LED हेडलाइट आणि मायलेज वाढवण्यासाठी Hero चे i3S स्टार्ट-स्टॉप सिस्टीम यांसारखी फीचर्स दिली आहेत.