
Suzuki ने आणली बायोगॅसवर चालणारी Victoris
नुकतेच मारुती सुझुकीने त्यांची नवीन एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच केली होती. ही एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Victoris. ही कार लाँच होताच ग्राहकांनी या एसयूव्हीला भरभरून प्रतिसाद दिला. आता सुझुकीने नवीन ‘Victoris’ चा नवीन व्हेरिएंट जपान मोटर शो 2025 मध्ये सादर केला आहे.
मारुती सुझुकीने आपली नवीन SUV ‘Victoris’ जपान मोटर शो 2025 मध्ये सादर केली आहे. ही SUV विशेषतः 4.2 मीटर ते 4.4 मीटर आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भरपूर फीचर्ससह ही एक स्टायलिश आणि टेक्नॉलॉजीने समृद्ध SUV मानली जात आहे.
या मॉडेलमध्ये डीझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध नाही, परंतु सुझुकीने पॉवरट्रेनचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात NA पेट्रोल, पेट्रोल + CNG, आणि पेट्रोल + इलेक्ट्रिक हायब्रिड अशा तीन पर्यायांचा समावेश आहे.
गाव असो की शहर, सगळीकडेच सुसाट चालतात ‘या’ 5 स्वस्त Diesel Cars
आता सुझुकीने Victoris चा एक नवीन वेरिएंट सादर केला आहे, जो CBG (Compressed Biomethane Gas) वर आधारित आहे. हा व्हेरिएंट Victoris CNG च्याच हार्डवेअरवर तयार करण्यात आला असून, त्यात CBG इंधनावर चालण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
हा नवीन पर्यावरणपूरक व्हेरिएंट प्रथमच जपान मोटर शो 2025 मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आला असून, या वाहनाने ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने सुझुकीचा आणखी एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
सीबीडी आणि सीएनजी दोन्ही गॅस-आधारित इंधन आहेत, परंतु त्यात एक महत्त्वाचा फरक आहे. सीएनजी हे नैसर्गिकरित्या बनवले जाणारे इंधन आहे जे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. दुसरीकडे, सीबीडी हा बायोमिथेन वायू आहे जो सेंद्रिय पदार्थ आणि दुग्धजन्य कचऱ्याच्या विघटनातून तयार होतो. हे एक असे इंधन आहे जे कमी वेळात तयार केले जाऊ शकते, तर सीएनजी तयार होण्यास लाखो वर्षे लागतात. सीबीडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन ग्रामीण भारतातील अनेक समस्या सोडवेल आणि स्वच्छ शहरांच्या दिशेने एक ठोस पाऊल देखील ठरू शकते. शिवाय, ते रोजगाराच्या संधी देखील निर्माण करू शकते.
सॅमसंग वॉलेटने Mahindra Electric SUVs साठी डिजिटल कार की सपोर्ट केला सादर
CBG (Compressed Biomethane Gas) हे जैविक कचरा आणि जनावरांच्या शेणापासून तयार केले जाते. त्यामुळे हे इंधन पर्यावरणपूरक असून स्थानिक आर्थिक विकासालाही चालना देते. तर CNG (Compressed Natural Gas) च्या तुलनेत CBG चे उत्पादन कमी वेळात करता येते. याशिवाय, CBG हे एक शाश्वत आणि रिन्यूएबल इंधन स्रोत असल्याने भविष्यातील ऊर्जेच्या गरजांसाठी हे अधिक पर्यावरणास हितकारक पर्याय मानले जाईल.