सॅमसंग वॉलेटने Mahindra Electric SUVs साठी डिजिटल कार की सपोर्ट केला सादर
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Samsung ने आज जाहीर केले की त्यांच्या सॅमसंग वॉलेट प्लॅटफॉर्मद्वारे आता महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन SUV मालकांना “डिजिटल कार की” फीचर्सचा लाभ मिळणार आहे. या सुविधेमुळे गॅलेक्सी स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या फोनच्या माध्यमातून गाडी लॉक, अनलॉक आणि सुरू करू शकतात, तेही प्रत्यक्ष चावीशिवाय!
महिंद्रा ग्रुप सॅमसंग वॉलेटशी डिजिटल कार की एकत्रित करणारा पहिला भारतीय OEM (Original Equipment Manufacturer) ठरला आहे. हे फीचर्स सध्या महिंद्रा XUV 9e आणि BE 6e मॉडेल्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
Google Maps ने दिला ना धोका! थेट नदीत घातली Maruti Gypsy, मालकाला बसला चांगलाच फटका
सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ संचालक (Services & Apps Business) मधुर चतुर्वेदी म्हणाले, “महिंद्रा ई SUV मालकांना सॅमसंग वॉलेटच्या माध्यमातून डिजिटल कीची सोय देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही सुविधा Galaxy ecosystem मधील कनेक्टेड आणि सुरक्षित अनुभव वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महिंद्रासोबतची ही पार्टनरशिप ड्रायव्हिंगला आणखी सोपे आणि स्मार्ट बनवेल.”
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे CEO आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल लि. चे कार्यकारी संचालक नलिनीकांत गोलागुंता म्हणाले,“आमच्या XUV 9e आणि BE 6e या SUV मॉडेल्सनी ग्राहकांचे लक्ष प्रगत टेक्नॉलॉजी आणि भविष्यातील डिझाईन्समुळे वेधून घेतले आहे. सॅमसंग वॉलेटसोबतच्या या पार्टनरशिपमुळे आम्ही आमच्या ग्राहकांना प्रीमियम, सुरक्षित आणि सोयीस्कर डिजिटल अनुभव देऊ शकतो.”
जपानच्या मोबिलिटी शो 2025 मध्ये Toyota FJ Cruiser सादर, लूक आणि फीचर्सच्या बाबतीत तोडच नाही
डिजिटल कार की हरवली किंवा फोन चोरीला गेला तरी वापरकर्ते Samsung Find सेवेद्वारे डिव्हाइस रिमोटली लॉक करू शकतात किंवा डेटा डिलीट करू शकतात. तसेच, सॅमसंग वॉलेटमध्ये बायोमेट्रिक आणि PIN-आधारित ऑथेंटिकेशनची सोय असल्यामुळे वापरकर्त्यांच्या कार्स आणि माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते.
सॅमसंग वॉलेट वापरकर्त्यांना डिजिटल कीज, पेमेंट कार्ड्स आणि ओळखपत्रे एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्याची सुविधा देते. हे ॲप Samsung Knox सिक्युरिटीद्वारे संरक्षित आहे आणि गॅलेक्सी डिव्हाइसेसमध्ये सुसंगत इंटरफेससह अखंड अनुभव देते.






