
'या' नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार्स ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors. नुकतेच कंपनीने त्यांची लोकप्रिय एसयूव्ही ‘Curvv’ चे नवीन व सुधारित एक्झिक्युटिव्ह व्हर्जन लाँच केले. या मॉडेलमध्ये कंपनीने आयसीई (ICE) आणि इलेक्ट्रिक (EV) दोन्ही व्हेरिएंट्समध्ये इंटीरिअरमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे या एसयूव्हीचा केबिन आता अधिक आरामदायी, आकर्षक आणि तंत्रज्ञानपूर्ण बनला आहे.
नवीन कर्व्हमध्ये भारतातील पहिल्यांदाच R-Comfort सीट्स विथ पॅसिव्ह व्हेंटिलेशन, सेरेनिटी स्क्रीन रियर सनशेड्स, रिअर आर्मरेस्टवरील ईजीसिप कप डॉक्स, व्हाईट कार्बन फायबर फिनिश डॅशबोर्ड, आणि ललितपूर ग्रे इंटीरिअरमधील बेनेक-कलिको लेदरेट सीट्स अशी लक्झरी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Yamaha काय ऐकत नाही! एकाच वेळी लाँच केली 4 नवीन वाहने, 2 E Scooters चा समावेश, किंमत…
तसेच, ट्विन-झोन क्लायमेट कॉन्सिर्ज एअर कंडिशनिंग आणि कर्व्ह.ईव्ही मध्ये PureComfort रिअर को-पॅसेंजर फूटरेस्ट व एर्गोविंग हेडरेस्टसह अधिक आरामदायी अनुभव मिळतो.
नवीन एक्झिक्युटिव्ह फीचर्ससह कर्व्हचे ICE व्हर्जन ₹14.55 लाखांपासून, तर कर्व्ह.ईव्हीचे 18.49 लाखांपासून (एक्स-शोरूम) दर सुरू होतात. हे अपडेटेड फीचर्स ‘Accomplish’ आणि ‘Empowered’ या दोन्ही पर्सोनामध्ये उपलब्ध असतील.
कर्व्ह ही टाटा मोटर्सची एक मिड-साईझ SUV कूपे असून, तिचे डिझाइन कंपनीच्या ॲटलास (ICE) आणि acti.ev (EV) आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्यामुळे तिला उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि रिअल-वर्ल्ड रेंज मिळते.
केबिनमध्ये व्हॉइस-ॲक्टिव्हेटेड पॅनोरॅमिक सनरूफ, मूड लायटिंग, जेस्चर-ॲक्टिव्हेटेड पॉवर्ड टेलगेट, आणि 500 लिटर बूट स्पेस यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत, कर्व्हमध्ये हार्मनची 12.3 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, JBL चे 9-स्पीकर साऊंड सिस्टीम, आणि Arcade.ev प्लॅटफॉर्म देण्यात आले आहे, जे एक प्रीमियम ऑडिओ अनुभव देते.
सुरक्षेच्या बाबतीतही कर्व्हने आपला ठसा उमटवला आहे. ही एसयूव्ही लेव्हल 2 ADAS तंत्रज्ञानासह येते आणि 5-स्टार भारत NCAP सेफ्टी रेटिंग मिळवलेली आहे.
कर्व्ह तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे
हे सर्व मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.