फोटो सौजन्य: @webtekno/X.com
Delhi Blast मुळे संपूर्ण दिल्ली शहर हाय अलर्ट झाले आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 गंभीर जखमी झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की काही क्षणातच लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, यामुळे आजूबाजूच्या कार्सना देखील आग लागली. हा स्फोट घडवण्यासाठी Hyundai i20 कारचा वापर करण्यात आला होता.
सोमवारी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर, Hyundai i20 ही कार चर्चेत आली आहे. ही कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आली होती. सध्या स्फोटाचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. आय20 ही पहिल्यांदा 2008 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. या कारने ह्युंदाई गेट्झची जागा घेतली आणि कंपनीला प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आणले.
या कारच्या पहिल्या जनरेशनमध्ये नवीन फ्लुइडिक डिझाइन लूक आणि पॉवरफुल इंजिन पर्याय होते. त्यानंतर 2014 मध्ये दुसरी जनरेशन आणि 2020 मध्ये तिसरी जनरेशन आली, ज्यामध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञान आणि स्टायलिंग आले. गेल्या काही वर्षांत, i20 अधिकाधिक प्रीमियम आणि फीचर्सनी समृद्ध झाली आहे, आजपर्यंत भारतात 13.5 लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
शहरी भागात प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये आणि तरुण कारप्रेमींमध्ये Hyundai i20 नेहमीच लोकप्रिय ठरली आहे. गेल्या काही वर्षांत या कारने तीन जनरेशनमधून स्वतःला पूर्णपणे बदलत आणले आहे आणि नेहमीच बाजारातील नव्या ट्रेंड्स आणि ग्राहकांच्या आवडीनुसार स्वतःला अपडेट केलं आहे. या कारचा प्रवास दाखवतो की Hyundai सतत नवकल्पना, सोयीसुविधा आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी कटिबद्ध राहिली आहे.
Dharmendra यांच्या Car Collection वर एकदा नजर टाकाच, पहिली कार तर फक्त 18,000 रुपयात केली होती खरेदी
2023 मध्ये Hyundai ने तिसऱ्या जनरेशनची i20 आणखी आकर्षक बनवत नव्या फेसलिफ्ट व्हर्जनसह सादर केली. या अपडेटमध्ये नवीन डिझाइन, अधिक फीचर्स आणि उत्तम व्हॅल्यू देण्यात आली आहे. या सुधारित मॉडेलमुळे i20 ची ओळख आणखी बळकट झाली असून ती टेक-सेव्ही आणि आधुनिक खरेदीदारांसाठी अधिक आकर्षक ठरली आहे. याच अपडेटमुळे i20 ने Tata Altroz आणि Maruti Suzuki Baleno सारख्या प्रतिस्पर्धी कारांमध्येही आपली लीडरशिप कायम ठेवली आहे.






