Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!

टाटा मोटर्सने ६६५ किमीची उत्तम रेंज, दमदार परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक डिजिटल फीचर्ससह आपली आयकॉनिक 'सिएरा.इव्ही' १८.७९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. या प्रीमियम मिड-एसयूव्हीचे बुकिंग आजपासून सुरू झाले असून १५ जुलै २०२६ पासून ग्राहकांना याची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 01, 2026 | 04:55 PM
टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
Follow Us
Follow Us:

मुंबई, १ जुलै २०२६: टाटा.इव्ही या भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज ऑल-न्‍यू सिएरा.इव्ही लाँच केली आहे. जुन्या लोकप्रिय कारला नव्या बोल्ड आणि इलेक्ट्रिक रूपात सादर करत कंपनीने इतिहास पुन्हा नव्याने लिहिला आहे. ही नवीन सिएरा.इव्ही तिच्या जुन्या आणि प्रसिद्ध डिझाईनला नेक्‍स्‍ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञानाशी जोडते, ज्यामध्ये ग्राहकांना उत्तम डिजिटल अनुभव आणि आधुनिक वैशिष्‍ट्यांसह दमदार एसयूव्हीचा अनुभव मिळेल.

सिएरा.इव्ही खऱ्याखुऱ्या रस्त्यांवर आपली बादशाहत सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे. ६६५ किमीची एमआयडीसी रेंज आणि ५१०-५३० किमीची वास्तविक रेंज देणाऱ्या या इव्हीसोबत लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटी मिळते. तिचे एक्सप्रेस चार्जिंग तंत्रज्ञान अवघ्या १५ मिनिटांमध्ये २६३ किमीपर्यंतचा प्रवास सुलभ करते, तर ५०४ एनएम टॉर्क आणि ३०६ पीएसच्या दमदार पॉवरमुळे ही गाडी अवघ्या ५.८ सेकंदांत ० ते १०० किमी/तास असा वेग पकडू शकते. यामध्ये ‘गो एनीव्हेअर, डू एनीथिंग’चा अनुभव देण्यासाठी ड्युअल-मोटर क्यूडब्ल्यूडी आणि अल्ट्रा ग्लाइड सस्पेंशनसह फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग देण्यात आले आहे. गाडीच्या केबिनमध्ये लक्झरी लाइफस्पेसचा फील देण्यासाठी सेगमेंटमधील सर्वात मोठे ‘पॅनोरामॅक्स सनरूफ’, थिएटर प्रो अनुभवासह ट्रिपल स्क्रीन्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि सोनिकशाफ्ट सिस्टीम उपलब्ध आहे. याशिवाय, ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी हायपएआर एचयूडी, ५४०० एचडी कॅमेरासह ४साईट ब्लाइंड स्पॉट व्ह्यू, विनासायास प्रवेशासाठी डिजि अ‍ॅक्सेस आणि ऑटो पार्क, समन व रिव्हर्स असिस्ट फीचर्स असलेला ‘ई-वालेट सूट’ यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान यात समाविष्ट आहे.

सगळ्यांसाठी नियम सारखाच…’या’ अंतर्गत नियमामुळे Noel Tata नोव्हेंबरमध्ये सोडणार पद, काय आहे Tata Sons ची Policy?

वेगळे डिझाईन, थरारक परफॉर्मन्स आणि रोजच्या वापरासाठी सोयीस्कर कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार खास तयार करण्यात आली आहे. यात एैसपैस जागा, स्मार्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट क्षमता मिळते. सिएरा.इव्हीच्या माध्यमातून टाटा.इव्हीने आधुनिक एसयूव्हीसाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे. ही एसयूव्‍ही गतीशील, क्षमतापूर्ण आणि अद्वितीयरित्‍या आयकॉनिक आहे. या कारचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. १५ जुलै २०२६ पासून डिलिव्‍हरी मिळण्यास सुरुवात होईल. सिएरा.इव्हीची सुरुवातीची किंमत १८.७९ लाख रूपये आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “सिएरा नेहमी गतीशीलतेसंदर्भात अग्रस्‍थानी राहिली आहे. ही वेईकल नाविन्‍यता, महत्त्वाकांक्षा व प्रगतीची प्रतीक राहिली आहे, तसेच भविष्‍यातील तंत्रज्ञान ग्राहकांच्‍या जवळ आणले आहे. पुन्‍हा सादर करण्‍यात आलेल्‍या या वेईकलने भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्‍ही सेगमेंटची निर्मिती करून एक नवा इतिहास रचला. आज, सिएरा.इव्हीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तोच वारसा पुढे नेत आहोत आणि इलेक्ट्रिक युगात एक प्रीमियम एसयूव्‍ही कशी असावी, याचा नवीन मापदंड प्रस्‍थ‍ापित करत आहोत. उत्‍कृष्‍ट रिअल-वर्ल्‍ड रेंज, उत्तम परफॉर्मन्‍स, इंटेलिजंट टेक्नॉलॉजी, अद्वितीय आरामदायीपणा आणि कुठेही जाण्‍याची क्षमता यांचा मेळ घालत सिएरा.इव्ही उत्तम अनुभव देते, जो जितका आकर्षक आहे, तितकाच परिवर्तनीय आहे.

मिड-एसयूव्‍ही सेगमेंट भारतातील एसयूव्‍ही बाजारपेठेचा गाभा आहे, जो नव्‍या पिढीच्‍या ग्राहकांमुळे आकाराला आला आहे. हे ग्राहक आपल्‍या वेईकलकडे त्‍यांची जीवनशैली, महत्त्वाकांक्षा आणि ओळखीचे प्रतिबिंब म्‍हणून पाहतात. ईव्‍ही आता मुख्‍य प्रवाहात वेगाने सामील होत असताना त्‍यांची आकर्षकता हाच त्‍यांच्‍या वापराला गती देणारा मुख्‍य घटक ठरेल. सिएरा.इव्ही या परिवर्तनाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ही वेईकल आमची आतापर्यंतची सर्वात प्रगत एसयूव्‍ही असण्‍यासोबत भविष्‍याची आकर्षक अभिव्‍यक्ती आहे, जी इलेक्ट्रिक गतीशीलतेला पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक, सुलभ व प्रभावी बनवते, तसेच भारताच्‍या स्‍वच्‍छ, शून्‍य-उत्‍सर्जन भविष्‍याकडील प्रवास अधिक वेगवान करते.”

सिएरा.इव्हीसह ग्राहकांना आता इलेक्ट्रिक वेईकलची निवड करणे किंवा प्रीमियम एसयूव्हीकडून असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे, यांपैकी एकाच गोष्टीची निवड करण्याची गरज उरलेली नाही. ही वेईकल अधिक उत्कृष्ट क्षमता, परफॉर्मन्स आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदान करते, ज्यामुळे इलेक्ट्रिक एसयूव्ही कशी असावी याचा नवीन मापदंड प्रस्थापित होतो.

टाटा लाँच करणार 2 नवीन इलेक्ट्रिक SUV! पावरट्रेन AWD फीचर्स सह पुढच्या पाचच महिन्यात येणार मार्केटमध्ये!

कार फीचर्स

क्झरी लाइफस्पेस विथ इंडल्जंट टेक्नॉलॉजीसह ही वेईकल एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि उत्कृष्ट कारागिरीच्या जोडीला प्रगत कनेक्टेड आणि डिजिटल अनुभव अखंडपणे प्रदान करून मालकीचा आनंद वेगळ्या पातळीवर नेते. रिअल-लाइफ रिअल-वर्ल्ड ईव्ही सुप्रीमसीच्या माध्यमातून, ही वेईकल आत्मविश्वास वाढवणारी रेंज, अल्ट्रा-फास्ट चार्जिंग आणि दैनंदिन उपयुक्तता देते, ज्यामुळे लांब पल्ल्याचा इलेक्ट्रिक प्रवास अगदी सुलभ होतो. या वेईकलमधील गो एनीव्हेअर, डू एनीथिंग (जीएडीए) परफॉर्मन्स क्षमता तिच्या मूळ गुणधर्मांना अधिक दृढ करते, जी दमदार परफॉर्मन्स, ऑल-व्हील-ड्राइव्ह क्षमता, इंटेलिजंट टेरेन मॅनेजमेंट आणि वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये उत्कृष्ट नियंत्रण व आत्मविश्वास देते.

लक्झरी लाइफस्पेस विथ इंडल्जंट टेक्नॉलॉजी:

सिएरा.इव्ही पारंपारिक एसयूव्हीच्या केबिनला खऱ्याखुऱ्या लाइफस्पेसमध्ये रूपांतरित करते, जिथे ऐतिहासिक रचना आणि आधुनिक, सुलभ तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ पाहायला मिळतो. ज्यामुळे प्रत्येक प्रवासाला अनुरूप असे वातावरण तयार होते. या वेईकलमध्‍ये विभागातील एैसपैस जागा आणि लाउंजसारखा मोकळेपणा, सखोल डिजिटल व संवेदनात्मक अनुभव मिळतो. सिनेमॅटिक इन्फोटेनमेंट आणि कॉन्सर्ट-ग्रेड ऑडिओपासून ते इंटेलिजंट कंट्रोल्स आणि पर्सनलायझेशनपर्यंत यातील प्रत्येक घटक आराम, आनंद आणि सुविधेला एका वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. परिणामी, ही जागा निव्वळ उपयुक्ततेच्या पलीकडे जाते, जी ग्राहकांच्या गरजा ओळखून प्रत्येक प्रवासाला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि रस्त्यावरील प्रवासाचा अनुभव पुन्हा नव्याने परिभाषित करण्यासाठी तयार केली गेली आहे.

रिअल-लाइफ रिअल-वर्ल्ड ईव्ही सुप्रीमसी:

सिएरा.इव्ही जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे, म्हणजेच दैनंदिन वापरामध्ये ईव्हीचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. केवळ प्रयोगशाळेतील दाव्यांच्या पलीकडे जाऊन या वेईकलमध्‍ये उत्कृष्ट रिअल-वर्ल्ड रेंज, अल्ट्रा-फास्ट चार्जिंग, इंटेलिजंट सॉफ्टवेअर आणि कनेक्टेड अनुभवांचे संयोजन आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक प्रवास अत्यंत सुलभ होतो. विनासायास मार्ग नियोजन आणि इन-बिल्ट पेमेंट पर्यायांपासून ते सातत्याने मिळणाऱ्या ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपग्रेड्सपर्यंत यातील प्रत्येक घटक ग्राहकांची चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. परिणामी, ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरते, जी आधुनिक जीवनशैलीत अगदी सहज सामावून जाते आणि ईव्ही मालकीचा अनुभव व्यावहारिक व सर्वोत्तम बनवते.

गो एनीव्हेअर, डू एनीथिंग परफॉर्मन्स

सिएरा.इव्ही इलेक्ट्रिक इंजिनची त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता आणि खऱ्याखुऱ्या ऑल-टेरेन (सर्व प्रकारच्या रस्त्यांवर धावण्याची) क्षमतेचा मेळ घालत एसयूव्हीच्या परफॉर्मन्सची व्याख्या बदलून टाकते. खास या वेईकलसाठी डिझाइन केलेल्या प्रगत प्युअर ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित ही वेईकल वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये उत्कृष्ट ट्रॅक्शन, नियंत्रण आणि अनुकूलतेसह उत्तम अॅक्‍सेलरेशन प्रदान करते. शहरातील रस्ते असो, महामार्ग असो किंवा आव्हानात्मक मार्ग असो ही वेईकल अत्यंत स्थिर, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि प्रतिसाद देणारी राहते. परिणामी, इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या परफॉर्मन्समध्ये नवीन मापदंड प्रस्थापित होतो, जिथे ताकद, अचूकता आणि वैविध्‍यता कोणत्याही तडजोडीशिवाय एकत्र येतात.

Web Title: Tata ev launched suv sierra auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV
  • Tata

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.