फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे ग्राहक पारंपरिक वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कारकडे अधिक झुकत आहेत. पर्यावरणपूरक पर्याय आणि कमी चालणारा खर्च यामुळेही ईव्हीला पसंती मिळत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेता अनेक पारंपरिक ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादन धोरणात बदल केला आहे. ज्या कंपन्या पूर्वी केवळ पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने तयार करीत होत्या, त्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या विकास आणि उत्पादनावर भर देत आहेत. शासकीय प्रोत्साहन योजनांमुळेही हा ट्रेंड वेग घेत आहे. परिणामी, भारतात ईव्ही बाजाराचा विस्तार जलदगतीने होत आहे.
सध्या देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, जे दमदार इलेक्ट्रिक वाहनं ऑफर करीत आहे. यातही ग्राहकांकडून सर्वात जास्त मागणी ही टाटाच्या इलेक्ट्रिक कार्सना मिळत आहे. नुकतेच जुलै 2025 मधील इलेक्ट्रिक कार्सचा सेल्स रिपोर्ट जरी झाला आहे. यात Tata Motors ने पहिले स्थान पटकावले आहे.
‘या’ ऑटो कंपनीने July 2025 गाजवला ! 31 दिवसात विकल्या 1.13 दुचाकी, विक्रीत 14% वाढ
जुलै 2025 मध्ये टाटा मोटर्सने एकूण 5,972 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या. तर विक्रीच्या या यादीत एमजी मोटर दुसऱ्या स्थानावर होती. गेल्या महिन्यात या कंपनीने एकूण 5,013 नवीन लोकांनी एमजी मोटरच्या इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या.
या विक्री यादीत महिंद्रा तिसऱ्या क्रमांकावर होती. गेल्या महिन्यात महिंद्राने एकूण 2,789 नवीन इलेक्ट्रिक कार विकल्या. तर या विक्री यादीत ह्युंदाई चौथ्या क्रमांकावर होती. या कालावधीत ह्युंदाईने एकूण 602 नवीन इलेक्ट्रिक कार विकल्या. याशिवाय, या विक्री यादीत BYD पाचव्या क्रमांकावर होती. जुलै 2025 मध्ये बीवायडीने एकूण 453 नवीन इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.
नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत आहात? August 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ अफलातून टू-व्हीलर
या विक्री यादीत बीएमडब्ल्यू सहाव्या क्रमांकावर होती. जुलै 2025 मध्ये बीएमडब्ल्यूने एकूण 225 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या. तर या विक्री यादीत मर्सिडीज बेंझ सातव्या क्रमांकावर होती. मर्सिडीज बेंझने एकूण 85 इलेक्ट्रिक कार विकल्या. याशिवाय, सिट्रोएन या विक्री यादीत आठव्या क्रमांकावर होती. या कंपनीने एकूण 41 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या.