फोटो सौजन्य: @utsavtechie (X.com)
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ग्राहकांमध्ये असणारी हीच मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या देशात बेस्ट रेंज आणि फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत आहे. यातही इलेक्ट्रिक कार ऑफर करण्यात टाटा मोटर्स आघाडीवर आहे. तसेच कंपनीच्या कारवर आजही ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत असतात. याव्यतिरिक्त, कंपनी कार्समध्ये सेफ्टी फीचर्स समाविष्ट करून ग्राहकांच्या सेफ्टीवर सुद्धा विशेष लक्ष देत आहे.
देशातील आघाडीच्या वाहन कंपन्यांपैकी एक असलेली टाटा मोटर्स भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. कंपनी उद्या (3 जून 2025) इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर ईव्ही अधिकृतपणे लाँच करणार आहे. ही एसयूव्ही प्रीमियम सेगमेंटमध्ये लाँच होणार आहे. या एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जाऊ शकतात? बॅटरी आणि मोटर किती पॉवरफुल असेल? ती कोणत्या किंमतीला लाँच केली जाऊ शकते? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Ola, Ather ची दांडी गुल करण्यासाठी लवकरच लाँच होणार ‘हे’ इलेक्ट्रिक स्कूटर
Tata Harrier EV मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येणार आहे. यामध्ये ऑफ रोड असिस्ट, ट्रान्सपरंट मोड, रॉक क्रॉल, स्नो मोड, एडीएएस, सँड मोड, 360 डिग्री कॅमेरा, एलईडी लाईट्स, पार्किंग सेन्सर, पॅनोरॅमिक सनरूफ, शार्क फिन अँटेना, रिअर वायपर आणि वॉशर, ऑफ रोडिंगसाठी क्यूडब्ल्यूडी असे अनेक उत्तम फीचर्स देण्यात येतील.
कंपनी या एसयूव्हीमध्ये 55 ते 60 किलोवॅट क्षमतेची बॅटरी देऊ शकतो. त्यामुळे ही एसयूव्ही पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 500 ते 550 किलोमीटरची रेंज देऊ शकते. एकापेक्षा जास्त बॅटरी ऑप्शन्ससह देखील या एसयूव्हीमध्ये दिली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
हॅरियर ईव्हीच्या लाँचिंगच्या वेळी टाटाकडून अचूक किमतीची माहिती दिली जाईल. परंतु भारतात ती सुमारे 20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
‘या’ ऑटो कंपनीचा नादच खुळा ! May 2025 मध्ये तब्बल 84000 पेक्षा जास्त वाहनांची केली विक्री
फीचर्स, किंमत, रेंज, या बाबतीत टाटा हॅरियर ईव्हीला Mahindra XEV9e, BYD Atto3, MG ZS EV सारख्या इलेक्ट्रिक एसयूव्हींशी थेट स्पर्धा करावी लागेल. याशिवाय, Hyundai Creta Electric आणि लवकरच लाँच होणाऱ्या Maruti Suzuki E Vitara यांच्याशीही ही एसयूव्ही स्पर्धा करू शकते.