फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसते. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस प्राधान्य देत आहेत. यातही इलेक्ट्रिक टू-व्हिलर्सला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हाच प्रतिसाद लक्षात घेता, अनेक कंपन्या येत्या काळात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करणार आहेत. जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पुढील काही महिन्यांत कोणते नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर होणार आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
जून 2025 मध्येच सुझुकी त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक स्कूटर सुझुकी ई अॅक्सेस लाँच करणार आहे. ही स्कूटर येत्या 11 जून 2025 रोजी लाँच होईल. यात काही उत्तम फीचर्स देखील असतील. ही स्कूटर जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली आहे. सुझुकी ई अॅक्सेस स्कूटरची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख ते 1.30 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
Virat Kohli च्या कार कलेक्शनमध्ये सर्वात महागडी कार कोणती? किंमत वाचूनच उडाल
हिरो मोटोकॉर्पने Vida या नावाने इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. भारतात कंपनी जुलैमध्ये अधिकृतपणे Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करेल. 1 जुलै 2025 रोजी, कंपनी दोन स्कूटर लाँच करेल, ज्यांची किंमत सध्याच्या मॉडेल्सपेक्षा कमी असू शकते. माहितीनुसार, या स्कूटरची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 80 हजार रुपये असू शकते.
सध्या टीव्हीएस मोटर्स iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे तीन व्हेरियंट बाजारात उपलब्ध करून देत आहे. लवकरच या स्कूटरचा सर्वात स्वस्त व्हेरियंट देखील लाँच केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी फेस्टिव्ह सीझनमध्ये नवीन स्कूटर लाँच करू शकते. माहितीनुसार, ही स्कूटर सुमारे 70 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केले जाऊ शकते.
‘या’ कंपनीच्या कारवर ग्राहकांचा जडला जीव ! May 2025 मध्ये 22,315 ग्राहकांनी केली खरेदी
यामाहा कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये त्यांचे पहिले उत्पादन लाँच करण्याची तयारी करत आहे. पुढील काही महिन्यांत, कंपनी त्यांची नवीन आणि पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच करू शकते. सध्या या स्कूटरची टेस्टिंग घेतली जात आहे. यामाहा ही नवीन स्कूटर 1.30 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करू शकते.