
फोटो सौजन्य: Pinterest
अलीकडेच Tata Nexon EV ने विक्रीच्या बाबतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम नेमका कोणता आहे, या इलेक्ट्रिक SUV मध्ये कोणते फीचर्स मिळतात आणि ती किती किमतीत खरेदी करता येते, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नव्या आणि अधिक आकर्षक रंग रूपात Kawasaki Ninja 650 लाँच, जाणून घ्या नवीन किंमत
Tata Motors कडून इलेक्ट्रिक SUV म्हणून ऑफर केली जाणारी Tata Nexon EV अलीकडेच विक्रीच्या बाबतीत मोठा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Tata Nexon EV ने 1 लाख युनिट्स विक्रीचा आकडा पार केला आहे. भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात ही एक महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.
Tata Nexon EV मध्ये कंपनीकडून अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक SUV मध्ये LED हेडलॅम्प्स, LED टेल लॅम्प्स, पॅडल शिफ्टर्स, चार्जिंग पोर्ट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर AC वेंट्स, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, पॅनोरमिक सनरूफ, पार्किंग सेन्सर्स, चारही चाकांमध्ये डिस्क ब्रेक्स, ऑटो होल्ड, हिल असिस्ट, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, 6 एअरबॅग्स, ESP, ABS, EBD, SOS कॉल, TPMS, 360 डिग्री कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स, OTA अपडेट्स, ऑटो डिमिंग IRVM, एअर प्युरिफायर, Apple CarPlay, Android Auto, वायरलेस चार्जर आणि 31.24 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.
Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs
Tata Nexon EV च्या 30 kWh व्हेरिएंटमध्ये दिलेली मोटर 95 किलोवाट पॉवर आणि 215 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ही SUV 0-100 किमी/तास वेग 9.2 सेकंदात गाठते. सिंगल चार्जमध्ये या व्हेरिएंटला 210-230 किमी इतकी रिअल-वर्ल्ड रेंज मिळू शकते.
तर 45 kWh व्हेरिएंटमध्ये 106 किलोवाट पॉवर आणि 215 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. हा व्हेरिएंट 0-100 किमी/तास वेग 8.9 सेकंदात गाठतो आणि सिंगल चार्जमध्ये 350-375 किमी पर्यंत चालवता येतो. या SUV मध्ये विविध ड्रायव्हिंग मोड्सही देण्यात आले आहेत.
भारतीय बाजारात Tata Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये पासून सुरू होते. तर या इलेक्ट्रिक SUV चा टॉप व्हेरिएंट 17 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत खरेदी करता येतो.