'या' नवीन सेफ्टी टेक्नॉलॉजीसह Nexon EV झाली लाँच
भारताची सर्वात मोठी फॉर-व्हीलर ईव्ही उत्पादक आणि देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी टाटा.ईव्हीने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. कंपनीने आपल्या लोकप्रिय नेक्सॉन.ईव्ही ४५ मध्ये अत्याधुनिक एडीएएस सुरक्षा तंत्रज्ञान दाखल केले असून, त्यासोबतच ग्राहकांच्या प्रीमियम अनुभवात भर घालणारी रियर विंडो सनशेड आणि ॲबियन्ट लाइटिंगसारखी आकर्षक फीचर्सही उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय कंपनीने नेक्सॉन.ईव्ही डार्कचे अनावरण करून उत्पादन पोर्टफोलियोला अधिक मोठे केले आहे.
नवीन फीचर्स एम्पॉवर्ड +ए४५, एम्पॉवर्ड +ए४५ डार्क आणि एम्पॉवर्ड +ए४५ रेड डार्क पर्सोनामध्ये उपलब्ध असतील. यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ₹१७.२९ लाख, ₹१७.४९ लाख आणि ₹१७.४९ लाख अशी आहे. विशेष म्हणजे, या सर्व व्हेरिएंट्सना 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण नेक्सॉन.ईव्ही श्रेणी आता अधिकृतपणे 5-स्टार सुरक्षा प्रमाणित ठरली आहे. याशिवाय, नेक्सॉन.ईव्ही ४५ मध्ये पहिल्या मालकासाठी लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे, ज्यामुळे ईव्ही खरेदीदारांना संपूर्ण मनःशांती मिळते.
किलेस एंट्री, 9 इंच टचस्क्रीन आणि सोबतीला बॅक कॅमेरा! GST कपातीनंतर 76 हजारांनी स्वस्त झाली ‘ही’ कार
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “ग्राहकांसाठी आमची उत्पादने अधिक आकर्षक आणि अर्थपूर्ण बनवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. नेक्सॉन.ईव्ही हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ADAS सुरक्षा तंत्रज्ञानासह डार्क आवृत्ती दाखल करून आम्ही या गाडीत एक ठळक सौंदर्यदृष्टी, आधुनिक फीचर्स आणि सुरक्षिततेचा उच्च दर्जा आणला आहे. हे आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असून, मोबिलिटी उद्योगात इनोव्हेशनचे नेतृत्व करण्याच्या आमच्या मिशनला नवी गती देते.”
नेक्सॉन.ईव्हीला ऑल-ब्लॅक सौंदर्यदृष्टीसह एक्स्टीरियरवर खास डार्क ट्रीटमेंट आणि इंटीरियरमध्ये ऑल-ब्लॅक लेदरेट बोल्स्टर्ड सीट्स दिल्या आहेत. गाडीमध्ये ३५०-३७० किमी सी७५ प्रत्यक्ष रेंज, फक्त ४० मिनिटांत २०%-८०% फास्ट चार्जिंग क्षमता, तसेच पॅनोरमिक सनरूफ, वाहन-ते-वाहन चार्जिंग, व्हेइकल टू लोड टेक्नॉलॉजी, ३१.२४ सेंमी हरमन टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, २६.०३ सेंमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी अनेक आधुनिक सोयी उपलब्ध आहेत.
एडीएएस सुरक्षा तंत्रज्ञानात ट्रॅफिक साइन रेकग्निशन, लेन सेंटरिंग सिस्टम, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलीझन वॉर्निंग (पादचारी/सायकलस्वार/कार), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (पादचारी/सायकलस्वार/कार) आणि हाय बीम असिस्ट यांसारखी फीचर्स समाविष्ट आहेत.
२०२० मध्ये लाँच झालेली नेक्सॉन.ईव्ही ही खरोखर एक गेम-चेंजर ठरली असून, तिने भारतात ईव्ही क्रांतीची पायाभरणी केली. आजही ती भारतातील सर्वाधिक विकली जाणारी ईव्ही आहे आणि त्याचे कारण म्हणजे या गाडीत असलेले आकर्षक तंत्रज्ञान, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि प्रगत सुरक्षा फीचर्सचे उत्तम मिश्रण.