फोेटो सौजन्य: @TataMotors_Cars (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. ही कंपनी प्रत्येक सेगमेंटमध्ये बेस्ट कार ऑफर करत आहे. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करताना दिसत आहे. कंपनीने फॅमिली बेस्ड कार देखील मार्केटमध्ये ऑफर केल्या आहेत. आज आपण अशाच एका बेस्ट कारबद्दल जाणून घेणार आहोत.
Maruti, Mahindra, Kia Skoda चे धाबे दणाणार, टाटा मोटर्स Nexon मध्ये करू शकते मोठे बदल
आपली स्वतःची कार असावी आणि त्यात आपण आपल्या कुटुंबासोबत लॉंग ड्राईव्हवर जावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासाठी 7 सीटर कार शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकतेच ऑटो एक्स्पो 2025 टाटाने टाटा सफारी क्लासिक सादर केली होती. आता ही कार यावर्षी लाँच होण्याची जास्त शक्यता आहे. चला या कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.
टाटा सफारी क्लासिकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, त्यात पॉवर स्टेअरिंग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम ABS, समोरील पॉवर विंडो, एअर कंडिशनर, ड्रायव्हरसाठी एअरबॅग, प्रवाशांच्या सीटवरील एअरबॅग, समोरील फॉग लाईट्स, क्लासी अलॉय व्हील्स, मल्टी फंक्शन स्ट्रिंग व्हील, टॅकोमीटर, डिजिटल क्लॉक, अॅडजस्टेबल हेडलॅम्प, रियर विंडो वायपर, सेंट्रल लॉकिंग असे अनेक फीचर्स असू शकतात.
Maruti Wagon R चा जुना स्टॉक विकण्यासाठी कंपनी देत आहे मन भरून डिस्कॉउंट्स
या कारच्या शक्तिशाली इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 2179 सीसी इंजिन असू शकते. जे 153.86bhp ची कमाल शक्ती आणि 400Nm चा कमाल न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन दोन्ही पर्याय मिळत आहेत. कारमध्ये 63 लिटरची इंधन टाकी उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ही कार प्रति लिटर 14.1 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते.
टाटा सफारी क्लासिकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी ती खूप कमी किमतीत ऑफर करू शकते अशी शक्यता आहे. कंपनीने ही कार 6 व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपयांपासून 16.62 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
वर नमूद केलेले सर्व तपशील मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीनुसार आहेत. या कारच्या बाजारपेठेत लाँचिंगची अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.