फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या कार आजही खरेदीदार डोळे झाकून खरेदी करत असतात. त्यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने देशात अनेक बेस्ट कार ऑफर केल्या आहे. आता कंपनी बाजारात सुपरहिट ठरलेली नेक्सॉन कारमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.
भारतीय बाजारपेठेत हॅचबॅकपासून एसयूव्ही सेगमेंटपर्यंत अनेक उत्तम कार देणारी टाटा मोटर्स नेक्सॉनमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. ही नवीन टाटा नेक्सॉन कधीपर्यंत लाँच होऊ शकते? कोणत्या कोणत्या एसयूव्हीला यामुळे आव्हान मिळेल? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा नेक्सॉन एसयूव्हीमध्ये मोठे बदल करू शकते. कंपनी या एसयूव्हीचे नवीन जनरेशन आणण्याची तयारी करत आहे.
Maruti Wagon R चा जुना स्टॉक विकण्यासाठी कंपनी देत आहे मन भरून डिस्कॉउंट्स
माहितीनुसार, पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर एसयूव्ही तयार करण्याऐवजी, दुसऱ्या जनरेशनमधील टाटा नेक्सॉन सध्याच्या प्लॅटफॉर्म X1 मध्ये काही बदल करून लाँच केली जाऊ शकते. ज्याचे अंतर्गत नाव गरुड आहे. मोठ्या बदलांसोबतच, या कारचे स्ट्रक्चर देखील सुधारले जाईल.
कंपनीने वेळोवेळी नेक्सॉनच्या सध्याच्या व्हर्जनमध्ये अनेक बदल केले आहेत. 2020 आणि 2023 मध्ये त्यात अनेक बदल करण्यात आले होते. 2018 मध्ये, या कारला ग्लोबल एनसीएपी कडून प्रौढांच्या सुरक्षेसाठी पाच स्टार आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तीन स्टार मिळाले होते. पण आता 2024 मध्ये झालेल्या क्रॅश टेस्टिंगमध्ये एसयूव्हीला प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पूर्ण पाच स्टार मिळाले.
रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीचे नवीन जनरेशन लाँच करताना यात अनेक उत्तम फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. यासोबतच, पॅनोरॅमिक सनरूफ, लेव्हल-२ एडीएएस, अँबियंट लाईट्ससह बाह्य आणि अंतर्गत भागात अनेक फीचर्स देखील दिली जाऊ शकतात.
Tata Motors कडून गुवाहाटीमध्ये अत्याधुनिक Registered Vehicle Scrapping Facility चे उद्घाटन
कंपनी त्यात 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल आणि सीएनजी इंजिन देते. तसेच, डिझेल इंजिनचा पर्याय देखील त्यात उपलब्ध आहे. पण नवीन जनरेशनमध्ये डिझेल इंजिन पर्यायाऐवजी इतर तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.
या संदर्भात टाटाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की कंपनी 2026 च्या अखेरीस किंवा 2027 मध्ये भारतात नवीन पिढीची टाटा नेक्सॉन लाँच करू शकते.
टाटा नेक्सॉन ही सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. या सेगमेंटमध्ये Maruti Breeza, Hundai Venue, Kia Sonet और Kia Syros, Mahindra XUV 3XO आणि Skoda Kylaq सारख्या एसयूव्ही उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये अनेक उत्तम फीचर्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले जात आहे. अशा परिस्थितीत, टाटाची नवीन नेक्सॉन या सर्व एसयूव्हींशी थेट स्पर्धा करेल.