फोटो सौजन्य: iStock
देशात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या बजेटनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. कंपनीने आतापर्यंत अनेक चांगल्या कार भारतीय मार्केटमध्ये ऑफर केल्या आहेत. यातीलच एक म्हणजे मारुती वॅगन आर.
आजही बजेट फ्रेंडली कार म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर मारुतीची वॅगन आर येते. किंमत स्वस्त आणि परफॉर्मन्स जबरदस्त हे वाक्य या कारला चपखल बसतं. जर तुम्ही सुद्धा ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे आता कंपनी या कारच्या जुन्या स्टॉकवर चांगला डिस्काउंट देत आहे.
मारुती सुझुकी इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये Wagon R ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ही अनेक दशकांपासून लोकांची आवडती कार बनली आहे. नवीन मॉडेल लाँच झाल्यापासून, त्याची विक्री झपाट्याने वाढली आहे. आता कंपनी या महिन्यात या हॅचबॅकची विक्री वाढवण्यासाठी कंपनी 48,100 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
आता ‘ही’ कार झाली अधिकच सुरक्षित; प्रत्येक व्हेरियंटमध्ये मिळणार 6 Airbag, किंमत फक्त…
कंपनी त्यांच्या मॉडेल इयर 2024 आणि 2025 दोन्हीवर समान डिस्काउंट देत आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ 28 फेब्रुवारीपर्यंत मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावर मिळणारी सूट माहित असली पाहिजे.
2024 आणि 2025 मध्ये बनलेल्या Maruti Wagon R च्या मॉडेलवर 48,100 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट दिले जात आहे. यामुळे आता जर तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर तुमच्या पैश्यांची अधिक बचत होऊ शकते.
लक्षात ठेवा ही सूट तुमच्या शहरात किंवा डीलरकडे कमी-अधिक असू शकते. अशा परिस्थितीत, कार खरेदी करण्यापूर्वी, डिस्काउंटशी संबंधित सर्व तपशील नीट जाणून घ्या.
‘या’ खास गोष्टीमुळे स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन पुरस्काराने सन्मानित
ब्रेझाची नवीन जनरेशन के-सिरीज 1.5- ड्युअल जेट डब्ल्यूटी इंजिनने सुसज्ज आहे. हे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाला समर्थन देते. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. तसेच ही कार 103 एचपीची पॉवर आणि 137 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की याची इंधन कार्यक्षमता देखील वाढली आहे. नवीन ब्रेझाचा मॅन्युअल व्हेरियंट 20.15 kp/l चा मायलेज देईल आणि ऑटोमॅटिक प्रकार 19.80 kp/l चा मायलेज देईल.
त्यात 360 डिग्री कॅमेरा आहे. हा कॅमेरा अतिशय हाय-टेक आहे आणि तो मल्टी इन्फॉर्मेशन देतो. हा कॅमेरा कारच्या ९ इंचाच्या स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमशी जोडला जाईल. हे सुझुकी आणि टोयोटा यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करते. या कॅमेऱ्याची खास गोष्ट म्हणजे कारमध्ये बसून तुम्ही स्क्रीनवर कारभोवतीचे दृश्य पाहू शकाल.
पहिल्यांदाच या कारमध्ये वायरलेस चार्जिंग डॉक देखील देण्यात आला आहे. या डॉकच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन वायरलेस पद्धतीने सहजपणे चार्ज करू शकाल. त्याच वेळी, ओव्हरहीट टाळण्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मारुतीचे अनेक कनेक्टिंग फीचर्स देखील त्यात उपलब्ध असतील. ज्यामुळे ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही खूप आलिशान आणि प्रगत बनते.