Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Sierra आणि Hyundai Creta या दोन SUVs ना चांगली मागणी मिळताना दिसते. मात्र, दोन्ही वाहनांपैकी बेस्ट कार कोणती? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 05:19 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना भारतात चांगली मागणी
  • Tata Sierra आणि Hyundai Creta ग्राहकांच्या आवडत्या कार
  • तुमच्या बेस्ट कार कोणती?
भारतात एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. हीच मागणी लक्षात घेत अनेक कार उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार SUVs ऑफर करत असतात. नुकतेच Tata Motors ने त्यांची क्लासिक Tata Sierra मार्केटमध्ये लाँच केली. ही कार 11.49 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत ऑफर करण्यात आली आहे. ही कार थेट लोकप्रिय एसयूव्ही Hyundai Creta सोबत स्पर्धा करणार आहे. मात्र, तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? चला याबद्दल जाणून घेऊयात.

याला म्हणतात बादशाही धंदे! Lamborghini Revuelto साठी केरळच्या पठ्ठ्याने खरेदी केली तब्बल 25 लाखांची नंबर प्लेट

डिझाइन आणि डायमेंशन्स

टाटा सिएरा तिच्या मस्क्युलर आणि अपराइट डिझाइनमुळे दमदार रोड प्रेझेन्स देते. आकाराच्या बाबतीतही सिएरा ह्युंदाई क्रेटापेक्षा मोठी आहे. सिएराची लांबी 4340 मिमी, रुंदी 1841 मिमी, उंची 1715 मिमी आणि व्हीलबेस 2730 मिमी आहे. तर क्रेटाची लांबी 4330 मिमी, रुंदी 1790 मिमी, उंची 1635 मिमी आणि व्हीलबेस 2610 मिमी आहे. या मोठ्या डायमेंशन्समुळे सिएरा आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक केबिन स्पेस आणि 622 लिटरचा विशाल बूटस्पेस देते, जो क्रेटाच्या 433 लिटर बूटस्पेसपेक्षा खूपच जास्त आहे.

इंजन आणि परफॉर्मन्स

दोन्ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहेत आणि दोन्ही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक मॉडेल्सची योजना देखील आहे. क्रेटामध्ये 1.5L MPi पेट्रोल, 1.5L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन मिळते. तर सिएरामध्ये 1.5L टर्बो-पेट्रोल (167.7 bhp) आणि 1.5L डिझेल इंजिन दिले आहे.

कागदावर पाहता, सिएराचे टर्बो-पेट्रोल इंजिन क्रेटाच्या 1.5L टर्बो इंजिनपेक्षा अधिक पॉवरफुल असून उत्तम परफॉर्मन्सची अपेक्षा निर्माण करते. मात्र, क्रेटा CVT, टॉर्क कन्व्हर्टर आणि DCT असे विविध ट्रान्समिशन पर्याय देते, ज्यामुळे ती बाजारात स्मूथ आणि विश्वसनीय ड्रायव्हिंग अनुभव देणारी SUV म्हणून ओळखली जाते.

Innova Crysta ला ‘ही’ Electric Car पाणी पाजणार! फीचर्स आणि सेफ्टीवर विशेष लक्ष

फीचर्स आणि तंत्रज्ञान

फीचर्सच्या बाबतीत नवीन टाटा सिएरा खरोखरच नवीन बेंचमार्क बनवते. यात तीन डिजिटल स्क्रीन्स (ड्रायव्हर, इन्फोटेनमेंट आणि सहचालक), सेगमेंटमधील सर्वात मोठे पॅनोरमिक सनरूफ, लेवल-2 ADAS (Advanced Driver Assistance System) आणि JBL साउंडबारसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. ह्युंदाई क्रेटाही वेंटिलेटेड सीट्स, ड्यूल-स्क्रीन सेटअप आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह उत्तम प्रकारे सुसज्ज आहे, पण सिएराच्या तुलनेत तिचे फीचर पॅकेज थोडे पारंपरिक वाटते. अत्याधुनिक आणि सेगमेंट-फर्स्ट फीचर्स हवे असतील तर सिएरा आघाडीवर आहे.

कोणती एसयूव्ही बेस्ट?

जर तुम्हाला पॉवरफुल अनुभव, अधिक जागा आणि नवीन तंत्रज्ञान (जसे की ADAS आणि ट्रिपल स्क्रीन) हवे असतील, तर टाटा सिएरा हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार अशा खरेदीदारांसाठी आहे ज्यांना बोल्ड आणि वैशिष्ट्यपूर्ण SUV हवी आहे.

जर तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत मजबूत रिसेल व्हॅल्यू, ट्रान्समिशन पर्यायांची विस्तृत श्रेणी आणि आरामदायी शहरी ड्राइव्ह असेल, तर हुंडई क्रेटा ही अधिक व्यावहारिक आणि सुरक्षित निवड आहे.

Web Title: Tata sierra vs hyundai creta which suv is perfect in features price and performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • tata motors

संबंधित बातम्या

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
1

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!
2

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा
3

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World
4

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.