फोटो सौजन्य: iStock
भारतात त्यांच्या कारसाठी व्हीआयपी नंबर खरेदी करणाऱ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. त्यात आता, केरळमधील एका व्यक्तीने त्याच्या कारसाठी तब्बल 25 लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली आहे. चला या व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात.
‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग
केरळमधील एका व्यक्तीने हा नंबर प्लेट खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हीआयपी नंबर बोली प्रक्रियेदरम्यान खरेदी करण्यात आला. ही नंबर प्लेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नावे वेणू गोपालकृष्णन असे आहे. जो आयटी उद्योजक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वेणुगोपाल कृष्णन यांनी हा खास नंबर प्लेट आपल्या Lamborghini Revuelto साठी खरेदी केला आहे. ही कार मॅट ऑलिव्ह ग्रीन रंगात असून कंपनीची पहिली हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल आहे. तसेच ही केरळमधील पहिली Lamborghini Revuelto ठरणार आहे.
Auto Tech Asia 2026 मध्ये 300 पेक्षा अधिक प्रदर्शकांचा सहभाग, ‘या’ दिवसापासून प्रदर्शनाला सुरुवात
ज्या वाहन क्रमांकासाठी वेणुगोपाल कृष्णन यांनी तब्बल 25 लाख रुपये मोजले तो नंबर KL 07 DH 7000 असा आहे. या नंबरसाठी बोलीची सुरुवात 25 हजार रुपयांपासून झाली होती. मात्र नंतर बोली चढत जाऊन ती तब्बल 25 लाखांपर्यंत पोहोचली आणि शेवटी कृष्णन यांनी ही रक्कम भरून हा नंबर आपल्या नावावर केला.
वेणुगोपाल कृष्णन यांनी यापूर्वीही आपल्या Lamborghini Urus साठी यंदाच्याच वर्षी तब्बल 45 लाख रुपये देऊन व्हीआयपी नंबर घेतला होता. तेव्हाही एर्नाकुलम आरटीओने ठरवलेल्या 25 हजार रुपयांच्या राखीव किमतीपासून त्यांनी बोलीची सुरुवात केली आणि शेवटी 45 लाख रुपये देऊन KL 07 DG 0007 हा नंबर मिळवला. याच बोली प्रक्रियेत थॉमसन साबू नावाच्या व्यक्तीनेही 25 लाख रुपये मोजून KL 07 DG 0001 हा नंबर खरेदी केला होता.






