टाटा टियागोवर मिळतेय बंपर सूट (फोटो सौजन्य - कारवाले)
भारतीय बाजारात विकली जाणारी टाटाची सर्वात स्वस्त कार टियागो आहे. बाजारात या कारचे १७ प्रकार उपलब्ध आहेत. टाटा टियागोची एक्स-शोरूम किंमत ४,९९,९९० रुपयांपासून सुरू होते. सध्या, या टाटा कारवर तीन ऑफर्स उपलब्ध आहेत. या सवलतीच्या ऑफर टाटा टियागोच्या MY2024 मॉडेलवर उपलब्ध आहेत. या वाहनाच्या खरेदीवर ३० हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
आजकाल खिशाला परवडणारी कार घ्यायची झाली तरीही ८ लाखापेक्षा जास्त किंमत असलेली बाजारात दिसून येते. मात्र टाटा टियागो अशी कार आहे ज्याची किंमत साधारण ५ लाखांपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ऑफर मिळते याबाबत आपण या लेखातून अधिक माहिती घेऊया. साधारण 30 हजार रूपये तुमचे वाचू शकतात आणि तुमच्याही घरी नवी कार येऊ शकते हे नक्कीच तुमच्यासाठीही उत्तम ठरू शकते.
टाटा टियागोवर सवलतीच्या ऑफर
टाटा टियागोमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. या कारच्या MY2024 मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटवर २०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये XM आणि XT (O) मॉडेल्सचा समावेश नाही. टाटा टियागोच्या सीएनजी मॉडेलवरही १५,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. टाटा टियागो एनआरजीच्या सर्व प्रकारांवर ३०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
Jio ने डिझाईन केली स्टायलिश E-Cycle, जाणून घ्या फिचर आणि किंमत
टाटा टियागोची ताकद
टाटा टियागोमध्ये ११९९ सीसी १.२-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आहे. कारमधील हे इंजिन ६,००० आरपीएमवर ८६ पीएस पॉवर आणि ३,३०० आरपीएमवर ११३ एनएम टॉर्क निर्माण करते. टाटा टियागो सीएनजी देखील बाजारात उपलब्ध आहे. टियागो सीएनजीवरील इंजिन ६,००० आरपीएमवर ७५.५ पीएस पॉवर आणि ३,५०० आरपीएमवर ९६.५ एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये २४२ लिटरची बूट स्पेस आहे. टाटा टियागोचा ग्राउंड क्लिअरन्स १७० मिमी आहे. या टाटा कारमध्ये पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहेत.
टाटा टियागोचे मायलेज
टाटा टियागोचा पेट्रोल मॅन्युअल प्रकार २०.०९ किमी प्रति लिटर मायलेज देतो. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, ही कार १९ किमी प्रति लिटर मायलेज देते. तर सीएनजी मोडमध्ये ही कार चांगले मायलेज देते. टियागो सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशनसह २६.४९ किमी/किलो आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह २८.०६ किमी/किलो मायलेज देते.
7 Seater Car ज्याच्यासमोर टोयोटा इनोव्हादेखील पडते फिकी, किंमत वाचून त्वरीत खरेदीसाठी निघाल
टाटा टियागोच्या किमती खालीलप्रमाणे
टाटा टियागोची एक्स-शोरूम किंमत ५.६० लाख रुपयांपासून सुरू होते आणि १२.०४ लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत प्रकार आणि इंधन प्रकारावर अवलंबून असते.
टाटा टियागोच्या किंमती:
टाटा टियागोचे काही प्रकार आणि त्यांच्या किंमती:
तुमच्या शहरातील टाटा टियागोची ऑन-रोड किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरला भेट देऊ शकता.