
Tej Pratap Yadav यांचे 'या' Cars वर विशेष प्रेम
सध्या देशभरात बिहार निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. अनेक दिग्गज नेते आणि त्यांची मुलं या निवणुकीच्या संग्रामात पाहायला मिळाली. असे एक नेते म्हणजे आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा जेष्ठ मुलगा तेज प्रताप यादव.
तेज प्रताप यादव हे त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्व, स्पष्टवक्ते शैली आणि अतुलनीय फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतात. राजकारण आणि अध्यात्माच्या पलीकडे, त्यांना लक्झरी कार आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या बाईक्सची आवड आहे. त्यांचे गॅरेज अनेक शक्तिशाली एसयूव्हींनी भरलेल्या कार शोपेक्षा कमी नाही. चला त्यांच्या कार कलेक्शनवर एक नजर टाकूयात.
तेज प्रताप यादव यांच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक म्हणजे 2012 मॉडेलची BMW लक्झरी सेडान, ज्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे. बीएमडब्ल्यू त्यांच्या प्रीमियम दर्जा, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि आरामदायी ड्रायव्हिंगसाठी ओळखल्या जातात आणि ही कार त्यांच्या कलेक्शनची शोभा वाढवते.
तेज प्रताप यादव केवळ लक्झरी किंवा आधुनिक वाहनांचे चाहते नाहीत तर ते क्लासिक आणि विंटेज कार्सचेही चाहते आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये मारुती सुझुकी जिप्सी आहे, जी मजबूत बांधणी आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. त्यांच्याकडे हिंदुस्तान अॅम्बेसेडर देखील आहे, जी भारतातील सर्वात प्रतिष्ठित कारपैकी एक मानली जाते.
आता Four Wheeler मार्केट गाजवणार! दुचाकी बनवणाऱ्या Hero Motocorp ने सादर केली नवीन इलेक्ट्रिक कार
लक्झरी कार्ससोबतच तेज प्रताप यांना वेगवान बाईक्सचीही प्रचंड आवड आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये असलेली हाय-परफॉर्मन्स स्पोर्ट्स बाईक तब्बल 15 लाखांच्या आसपास किंमतीची असल्याचे सांगितले जाते. ही बाईक केवळ स्पीडसाठीच नव्हे, तर तिच्या स्पोर्टी लुक आणि मॉडर्न फीचर्समुळेही खूप लोकप्रिय ठरली आहे.
तेज प्रताप यांच्या कलेक्शनमध्ये Skoda Slavia ही स्टायलिश आणि कम्फर्ट देणारी कारदेखील आहे, ज्याची किंमत सुमारे 22 लाख रुपयांच्या आसपास आहे. या कारचे डिझाइन, फीचर्स आणि प्रीमियम फील त्यांच्या गॅरेजला अधिक आकर्षक बनवतात. त्याचबरोबर Ford Endeavour ही दमदार SUV ही त्यांच्या ताफ्यात आहे. पावरफुल इंजिन आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेली एंडेवर त्यांच्या कलेक्शनला एक रॉयल आणि मजबूत ओळख देते.
एकंदर पाहता, तेज प्रताप यादव यांचा कार आणि बाईक कलेक्शन त्यांच्या लाइफस्टाइल आणि पर्सनॅलिटीचे स्पष्ट दर्शन घडवतो.