फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे नेहमीच जगातील मोठमोठ्या ऑटो कंपन्यांना खुणावत असतं. म्हणूनच आजही भारतात विविध ऑटो कंपन्या आपल्या अत्याधुनिक कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. आता तर भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता जगात आपल्या इलेक्ट्रिक कारने हवा करणारी टेस्ला आता भारतात येणार आहे.
एलोन मस्कची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला लवकरच भारतात एन्ट्री मारू शकते. गेल्या अनेक महिन्यांपासून, टेस्लाचे इलेक्ट्रिक वाहन Model Y मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकन कंपनी लवकरच भारतात प्रवेश करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
अब्जाधीश एलोन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात आल्यानंतर त्यांचे पहिले इलेक्ट्रिक वाहन Model Y लाँच करण्याची तयारी करत आहे. तथापि, कंपनी भारतात त्यांची मॉडेल वाय कार दुसऱ्या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे.
टेस्लाने भारतात लाँच होण्यापूर्वी महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे शोरूमसाठी 4003 चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. या जागेचे भाडे सुमारे 35.26 लाख रुपये आहे. याशिवाय, टेस्ला राजधानी दिल्लीत त्यांचे शोरूम उघडण्याच्या योजनेवरही काम करत आहे. ज्यासाठी कंपनीने भारतात सेल्स, कस्टमर सपोर्ट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यासारख्या कामांसाठी 20 हून अधिक नोकऱ्यांसाठी भरती सुरू केली आहे.
आता भारतीय रस्त्यांवर दिसणार 2025 Kawasaki Ninja 650 चा जलवा, नव्या रंगात लाँच झाली बाईक
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाची स्ट्रॅटर्जी सुरुवातीला पूर्णपणे CBU मॉडेल्सवर केंद्रित असेल, ज्यामध्ये Model Y आणि Model 3 सारख्या इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. त्याच वेळी, जर आपण त्याच्या किमतीबद्दल बोललो तर, भारतात टेस्लावर लादलेला कर तिच्या ईव्हीच्या किमतींवर परिणाम करू शकतो. भारतात टेस्लाच्या पहिल्या ईव्ही मॉडेल Y ची किंमत सुमारे 60 ते 70 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. जे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, व्होल्वो आणि बीवायडी सारख्या प्रीमियम कार कंपन्यांशी तसेच भारतातील इतर कार कंपन्यांशी स्पर्धा करेल.