फोटो सौजन्य: @Kawasaki_News (X.com)
भारतात हाय परफॉर्मन्स बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. म्हणूनच तर देशात अनेक उत्तम स्पोर्ट बाईक उत्पादक कंपन्या आहेत ज्या बेस्ट बाईक ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे कावासाकी. नुकतेच या कंपनीने मार्केटमध्ये आपली नवीन बाईक लाँच केली आहे.
कावासाकीने त्यांच्या मध्यम आकाराच्या स्पोर्ट टूरिंग बाईक Ninja 650 चे नवीन 2025 व्हर्जन भारतात लाँच केले आहे. ही बाईक नवीन लाईम ग्रीन रंगाच्या पर्यायात उपलब्ध असेल. कंपनीने याची एक्स-शोरूम किमतीत किरकोळ वाढ केली असून आता त्याची किंमत आता 7.27 लाख रुपये केली आहे. आता ही बाईक पूर्वीपेक्षा 11,000 रुपयांनी महाग झाली आहे. जुन्या व्हर्जनसाठी उपलब्ध असलेला एकमेव रंग पर्याय म्हणजे लाईम ग्रीन, परंतु नवीन व्हर्जनमध्ये ग्राहकांना वेगळा रंग पाहायला मिळेल.
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तुटून पडलेत ग्राहक ! 53 टक्के मार्केटवर एकट्याने गाजवतेय वर्चस्व
आता ही नवीन बाईक अधिक बोल्ड अवतारात दिसत आहे. याचे कारण या बाईकचे बॉडीवर्क प्रामुख्याने हिरवे आहे आणि त्यावर पांढरे, पिवळे आणि काळे रंगाचे बारीक पट्टे आहेत. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की काही कावासाकी डीलर्सकडे अजूनही जुने मॉडेल्स स्टॉकमध्ये आहेत. ज्यावर कंपनीकडून 25,000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे त्याची एक्स-शोरूम किंमत 6.91 लाख रुपये झाली आहे.
2025 Kawasaki Ninja 650 च्या टेक्निकल स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक मागील मॉडेलसारखेच दिसते. यात 649 सीसी, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे 8,000 आरपीएमवर 67 बीएचपी आणि 6,700 आरपीएमवर 64 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ही मोटर सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
या बाईकचे वजन 196 किलो (कर्ब) आहे. हे 17-इंच अलॉय व्हील्सवर चालते, ज्यामध्ये 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. बाईकला पुढील बाजूस 300 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिमी रोटरच्या मदतीने अँकर दिले आहेत. कावासाकी निन्जा 650 चा सर्वात जवळचा स्पर्धक ट्रायम्फ डेटोना 660 आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 9.72 लाख रुपये आहे.