Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब गावची गजब कहाणी! मेघालयातील ‘व्हिसलिंग व्हिलेज’! जिथे माणसांची नावे अक्षरांनी नाही, तर ‘संगीतांच्या धुनीने’ ओळखली जातात!

मेघालयातील काँगथॉन्ग या 'व्हिसलिंग व्हिलेज'मध्ये माणसांना ओळखण्यासाठी अक्षरांची नावे नसून 'जिंगरवाई इयावबेई' नावाची संगीताची विशिष्ट धून वापरली जाते. निसर्ग व संस्कृतीशी जोडलेली ही अनोखी परंपरा जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 21, 2026 | 08:00 AM
अजब गावची गजब कहाणी! मेघालयातील ‘व्हिसलिंग व्हिलेज’! जिथे माणसांची नावे अक्षरांनी नाही, तर ‘संगीतांच्या धुनीने’ ओळखली जातात!
Follow Us
Follow Us:
  • या गावात माणसांना ओळखण्यासाठी अक्षरांची नावे नसून, प्रत्येक व्यक्तीसाठी एक स्वतंत्र व विशिष्ट संगीताची धून असते.
  • घरात प्रेमाने हाक मारण्यासाठी ‘छोटी धून’ आणि जंगलात किंवा दऱ्याखोऱ्यांत लांब अंतरावरून संवाद साधण्यासाठी ‘मोठी धून’ वापरली जाते.
  • डोंगराळ भागात लांबपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी अनोखी सुरांची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

‘कुहू कुहू’ असं कधीतरी तुम्ही भल्या पहाटे किंवा संध्याकाळी झाडावर बसलेल्या कोकिळेच्या तोंडून नक्की ऐकले असतील. पण तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, हे असे संगीताचे ध्वनी कोणा व्यक्तीचे नाव असेल तर! मेघालयाच्या घनदाट जंगलांमध्ये आणि निसर्गरम्य टेकड्यांमध्ये एक असे अद्भूत गाव वसलेले आहे, जिथे राहणाऱ्या माणसांना ओळखण्यासाठी आपल्यासारखी अक्षरांची नावे नसून गाण्याच्या सुबक मधुर धुनी वापरल्या जातात. होय, हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कल्पनेसारखे वाटत असले तरी ते पूर्णपणे सत्य आहे.

लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!

संगीताच्या सुरांवर चालणारे गाव: मेघालयातील ‘काँगथॉन्ग‘, जिथे माणसांची नावे गाण्याच्या धुनी असतात!

भारताचे ईशान्येकडील राज्य असलेल्या मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात वसलेले ‘काँगथॉन्ग’ हे गाव जगभरात ‘व्हिसलिंग व्हिलेज’ म्हणजेच शिट्ट्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील खासी जमातीचे लोक आपल्या मुलांना हाक मारण्यासाठी कोणत्याही पारंपारिक नावाचा वापर करत नाहीत, तर प्रत्येकासाठी एक विशिष्ट आणि स्वतंत्र संगीताची धून तयार करतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात गेल्यावर तुम्हाला माणसांच्या आवाजाऐवजी हवेत केवळ सुमधुर सुरांचे गुंजन ऐकायला मिळते, आहे कि नाही नवल!

‘जिंगरवाई इयावबेई‘ ही अनोखी परंपरा

या गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला आईकडून एक विशिष्ट धून भेट म्हणून दिली जाते, ज्याला स्थानिक भाषेत ‘जिंगरवाई इयावबेई’ असे म्हणतात; ज्याचा अर्थ ‘वंशाच्या पहिल्या मातेचे गाणे’ असा होतो. मूल जन्माला आल्यानंतर त्याची आई त्याच्यासाठी मनातून एक सुंदर आणि नवीन धून तयार करते. या धुनीचे दोन प्रकार असतात—एक छोटी धून जी घरात मुलाला प्रेमाने हाक मारण्यासाठी वापरली जाते आणि एक मोठी धून जी जंगलात लांब अंतरावरून मुलाशी संवाद साधण्यासाठी वापरली जाते. आपल्या लहान मुलाला आई जेव्हा जेवायला आणि पाठीवर थोपवून झोपवायला घालण्यासाठी या धुनींचा वापर करतात. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीची धून पूर्णपणे वेगळी असते आणि कोणाचीही धून एकमेकांशी जुळत नाही.

एखादा माणूस बिना अन्न-पाण्याचे किती दिवस जगू शकतो? सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचे वर्ल्ड रेकोर्ड कोणाकडे आहे?

निसर्गाशी जोडलेली संस्कृती आणि इतिहास

काँगथॉन्ग गावातील लोकांच्या मते, ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून हिचा थेट संबंध त्यांच्या भौगोलिक परिस्थितीशी आहे. येथील डोंगर आणि खोल दऱ्यांमुळे एकमेकांना आवाजाने हाक मारणे कठीण असते, परंतु संगीताचे सूर दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करत लांबपर्यंत सहज पोहोचतात. याशिवाय, शिकारीला किंवा जंगलात लाकूड गोळा करायला गेल्यावर जंगली प्राण्यांना मानवी आवाजाचा सुगावा लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून मुलांचे रक्षण व्हावे, या विश्वासानेही ही सुरांची भाषा जन्माला आली. येथील लोकांकडे कागदोपत्री इंग्रजी किंवा खासी नावे असली, तरी गावात मात्र ते फक्त त्यांच्या संगीतमय धुनीनेच ओळखले जातात. ही खरोखरच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, नाही का?

Web Title: The whistling village of meghalaya lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Meghalaya

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.