फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच होत आहे. यात खासकरून इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यामागे अनेक कंपनीचा विचार आहे. शहरी भागात तर आता इलेक्ट्रिक कार्ससोबतच ई-बाईक आणि स्कूटर सुद्धा रस्त्यांवर धावताना दिसत आहे.
वाढत्या पेट्रोलच्या किंमतींना कंटाळून अनेक जण इलेक्ट्रिक बाईक आणि स्कुटरला प्राधान्य देताना दिसत आहे. या वाढलेल्या मागणीमुळे ऑटो कंपनीज सुद्धा इलेक्ट्रिक वाहनं बनवण्याकडे जास्त लक्षकेंद्रित करत आहे. म्हणूनच तर इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स सेगमेंटची चांगली भरभराट होताना दिसत आहे.
अनेक कंपनीज 2025 मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये होंडा, टीव्हीएस आणि सुझुकीसारख्या कंपनीजचा समावेश आहे. या कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलरवर काम करत आहेत. या स्कूटर्स भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सादर केल्या जातील अशी अपेक्षा आहे. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या असतील.
Honda Motors मार्च 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यावर काम करत आहे. यात दोन होंडा मोबाईल पॉवर पॅक असू शकतात, जे वेगळे करण्याची तसेच बदलण्याची सुविधा असेल. डिजीटल टच स्क्रीन इंस्ट्रुमेंटल कन्सोल, कीलेस स्टार्ट आणि स्टॉप फीचर देखील यामध्ये पाहायला मिळतात.
ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकते. आगामी Honda Activa EV ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते. हे नवी दिल्लीतील इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते.
हे देखील वाचा: 2 लाखांच्या डाऊन पेमेंटवर Tata Tigor विकत घेतल्यास किती असेल EMI?
TVS येत्या सहा महिन्यांत भारतात दोन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करणार आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, कंपनी B2B मार्केटसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करू शकते. दुसरीकडे, ते दुसऱ्या स्कूटर TVS Jupiter चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करू शकते.
ही TVS ची अतिशय लोकप्रिय स्कूटर आहे. असे म्हटले जात आहे की ही स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यानंतर 70-80 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येऊ शकते.
जपानी ऑटोमोबाईल निर्माता 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देखील लाँच करू शकते, जी Burgman EV असू शकते. एका अहवालानुसार, सुझुकीने बर्गमन ईव्हीसाठी वार्षिक 25,000 युनिट्सच्या विक्रीचे लक्ष्य देखील ठेवले आहे. यामध्ये डिटेचेबल बॅटरीऐवजी फिक्स्ड बॅटरी पॅक दिसू शकतो. ही स्कूटर जानेवारी 2025 मध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये पदार्पण करू शकते.