
फोटो सौजन्य: Gemini
नवीन जीएसटी दरानंतर 350 सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईकवरील GST दर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे मध्यमवर्गीयांसाठी बाईक अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. जर तुम्ही देखील नवीन बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आपण पाच परवडणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.
या यादीतील पहिले नाव म्हणजे हिरो एचएफ डिलक्स. ही बाईक भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या परवडणाऱ्या बाइकपैकी एक आहे. जीएसटी कपातीनंतर, याची किंमत अंदाजे 5 हजार 800 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे ती आणखी बजेट-फ्रेंडली बनली आहे. याची किंमत आता 55 हजार 992 रुपये एक्स-शोरूम आहे.
Honda City ला फुटलाय घाम! ‘या’ कारच्या विक्रीत भरमसाट वाढ, ग्राहक तर अक्षरशः तुटून पडलेत
टीव्हीएस स्पोर्ट ही आणखी एक बाईक तिच्या उत्कृष्ट मायलेज आणि कमी किमतीसाठी ओळखली जाते. या बाईकलाही जीएसटी कपातीचा फायदा होत आहे. परिणामी, याची सुरुवातीची किंमत आता 55 हजार 100 रुपये एक्स-शोरूम आहे.
होंडा शाइन 100 लाही जीएसटी कपातीचा मोठा फायदा झाला आहे. या बाईकमुळे आता 5600 रुपयांची बचत होते. बाईकची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 63 हजार 191 रुपये आहे. शाइनमध्ये 98.9 सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. ही बाईक प्रति लिटर ५५-६० किलोमीटर मायलेज देऊ शकते.
हिरो स्प्लेंडर प्लस ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक आहे. जीएसटी कपातीनंतर, या बाईकची किंमत 6 हजार 800 रुपयांनी कमी झाली आहे. त्याची नवीन किंमत आता ₹73,902 एक्स-शोरूम आहे.
अनोख्या स्टाईलमध्ये दिसली Tata Sierra, टिझरमध्ये दिसला ट्रिपल स्क्रिन डॅशबोर्ड
बजाज प्लॅटिना याच्या परवडणाऱ्या किमतीसाठी आणि मजबूत मायलेजसाठी ओळखली जाते. जीएसटी कपातीनंतर, प्लॅटिना 100 ची एक्स-शोरूम किंमत फक्त 66,052 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. बाईकमध्ये 102 सीसी, डीटीएस-आय इंजिन आहे जे प्रति लिटर 70 किमी मायलेज देते.