फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजरात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही अनेकदा एसयूव्ही विभागातील वाहनांना विशेष स्थान मिळत असते. मात्र, या एसयूव्हीच्या धामधुमीत एका सेडान कारने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही कार Honda City सोबत स्पर्धा देखील करते. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फोक्सवॅगन इंडियाने पहिल्यांदाच Virtus सेडानची सर्वाधिक मासिक विक्री गाठली आहे. कंपनीने ऑक्टोबर 2025 मध्ये मॉडेलच्या 2,453 युनिट्स विकल्या, जे लाँच झाल्यापासूनचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून, Virtus ने प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये 40% पेक्षा जास्त मार्केट शेअर राखला आहे, ज्यामुळे या श्रेणीतील कारचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार होंडा सिटी आणि ह्युंदाई व्हर्ना सारख्या कारशी स्पर्धा करते.
या आकडेवारीसह, फोक्सवॅगनच्या भारतात बनवलेल्या मॉडेल्सनी आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. Taigun SUV आणि Virtus Sedan ची एकूण देशांतर्गत विक्री आता 1.6 लाख युनिट्सपेक्षा जास्त झाली आहे. दोन्ही कार कंपनीच्या इंडिया 2.0 प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत. दोन्ही कार MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर बनवल्या आहेत आणि स्थानिकीकरणाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. यापूर्वी, व्हर्टसने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला: ती भारतातील सर्वाधिक विक्री होणारी सेडान बनली.
New Hyundai Venue चा कोणता व्हेरिएंट खरेदी करणे तुमच्यासाठी असेल एकदम परफेक्ट?
SUV च्या वाढत्या बाजारातही आपली पकड कायम ठेवणाऱ्या काही सेडान कार्सपैकी Volkswagen Virtus ही एक ठरली आहे. Virtus च्या सातत्याने वाढणाऱ्या विक्रीमुळे आणि Taigun च्या स्थिर मागणीमुळे Volkswagen ने भारतातील प्रीमियम कार सेगमेंटमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, आता ग्राहकांचा कल हाय-एंड मॉडेल्सकडे वाढत असून, यावरून स्पष्ट होते की लोकांना आता जास्त फिचर्स आणि उत्तम परफॉर्मन्स असलेल्या कार्स अधिक पसंत पडत आहेत.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीने ऑक्टोबर 2025 मध्ये 6.50 लाख युनिट्सची केली विक्री
Volkswagen च्या India 2.0 या रणनीतीचा कणा म्हणजे Taigun आणि Virtus हे दोन मॉडेल्स. Taigun ही कार प्रामुख्याने कॉम्पॅक्ट SUV ग्राहकांसाठी आहे, तर Virtus ही सेडान प्रेमींसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.
या दोन्ही कार्सनी Volkswagen ला भारतातील मास-प्रीमियम मार्केटमध्ये बळकट ओळख निर्माण करून दिली आहे. पुढील काळातही ही दोन्ही मॉडेल्स कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत, कारण Volkswagen आता वाढत्या स्पर्धेला सामोरे जाण्यास सज्ज होत आहे.






