
Triumph Street Triple 798 RS Launched In India (फोटो सौजन्य-AI एआय)
ब्रिटिश दुचाकी कंपनी Triumph Motorcycles ने भारतात नवीन Triumph Street Triple 798 RS लाँच केली आहे. या नव्या Street Triple RS 798 ची एक्स-शोरूम किंमत 14.39 लाख रुपये आहे. जुन्या 765 RS मॉडेलच्या जागी आलेल्या या बाइकमध्ये 798cc चे नवीन इंजिन, सुधारित चेसिस आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्स देण्यात आले आहेत. 2027 Triumph Street Triple RS चे डीलरशिपमध्ये आगमन फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे.
नवीन स्ट्रीट ट्रिपल 798 RS च्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला नवीन ट्विन LED DRL आणि मध्यभागी प्रोजेक्टर हेडलॅम्प दिला आहे. नवीन अॅल्युमिनियम सबफ्रेम, अंडरबेली एक्झॉस्ट आणि मल्टीफंक्शन इंडिकेटर्समुळे बाइकमध्ये स्पोर्टी लूक दिसतो. ही बाइक Sapphire Black, Carnival Red आणि Interstellar Blue अशा 3 रंगांमध्ये येते.
Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती
या बाइकमध्ये Moto2 रेसिंगमधील अनुभवावर आधारित 798cc, लिक्विड-कूल्ड, इनलाइन 3-सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 11,500 rpm वर 135 PS पॉवर आणि 9,250 rpm वर 86 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि बायडायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळतो. स्लिप अँड असिस्ट क्लचमुळे गिअर बदलताना रायडरला जास्त नियंत्रण मिळते.
नवीन अॅल्युमिनियम पेरिमीटर फ्रेम, हलका स्विंगआर्म आणि सुधारित स्टीअरिंग जिओमेट्रीमुळे बाइकच्या हाताळणीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुढे 41mm Showa USD फोर्क्स आणि मागे Öhlins STX46 मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. ब्रेकिंगसाठी पुढे Brembo Stylema कॅलिपर्ससह 310mm डिस्क आणि मागे 220mm डिस्क मिळते. बाइकमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स आणि Pirelli Supercorsa SP V3 टायर्स आहेत.
Bajaj Chetak EV ची 10 लाख विक्री पार! इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये बजाजचा मोठा टप्पा
इलेक्ट्रॉनिक फीचर्समध्ये 7 रायडिंग मोड्स, कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, फ्रंट व्हील लिफ्ट कंट्रोल, लॉन्च कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे. याशिवाय 7-इंच Bosch TFT टचस्क्रीनवर Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट मिळतो. नेव्हिगेशन, म्युझिक आणि मेसेजिंगची सुविधाही यात आहे.
या बाइकचे वजन 183 किलो असून सीटची उंची 836mm आहे. फ्युल टँकची कॅपसिटी 15 लिटर आहे. पर्यायी अॅक्सेसरीजच्या मदतीने सीटची उंची 791mm पर्यंत कमी करता येते. कंपनीने सर्व्हिस इंटरव्हल 10,000 किमी किंवा 12 महिने निश्चित केला आहे.