(फोटो सौजन्य-AI एआय)
ब्लॅक थीमसोबत आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स
Black Diamond Edition मध्ये मुख्य आकर्षण त्याचा खास ब्लॅक लूक आहे. यासोबत दोन्ही मोटरसायकलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक रायडिंग फीचर्स मिळतात. क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग ABS, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लॉन्च कंट्रोल आणि ड्रॅग टॉर्क कंट्रोल यांचा त्यात समावेश आहे. संबंधित कॉन्फिगरेशनमध्ये Dynamic Stability Control, विविध रायडिंग मोड्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेही मिळतो. RR 310 मध्ये आता Keyless Ride फीचरही देण्यात आले आहे.
TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती
RR 310 मध्ये 38 PS पॉवर
टीव्हीएस अपाचे RR 310 मध्ये 312.2 cc लिक्विड-कूल्ड, रिव्हर्स-इन्क्लाइन्ड सिंगल-सिलिंडर DOHC इंजिन आहे. Sport आणि Track मोडमध्ये हे इंजिन 38 PS पॉवर आणि 29 Nm टॉर्क तयार करते. Urban आणि Rain मोडमध्ये आउटपुट 30 PS आणि 26.5 Nm होते. 6-स्पीड गिअरबॉक्स व स्लिपर क्लचसह बाइकचा टॉप स्पीड 164 kmph आहे.
TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
RTR 310 चे वजन कमी
RTR 310 मध्ये 312.12 cc इंजिन असून Sport, Track आणि SuperMoto मोडमध्ये 35.6 PS पॉवर व 28.7 Nm टॉर्क मिळतो. Urban आणि Rain मोडमध्ये पॉवर 27.1 PS होते. RTR 310 चे वजन 169 kg, तर RR 310 चे वजन 174 kg आहे. दोन्ही बाइक्समध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, 110/70 फ्रंट आणि 150/60 रिअर टायर्स तसेच 300 mm आणि 240 mm डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. RR 310 ची सीट हाइट 810 mm, तर RTR 310 ची 800 mm आहे.






