Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी TVS ची पहिली रेस बाइक! 20 PS पॉवर अन् 110 चा स्पीड; TVS ची नवी Apache RR 200 Mini GP बाइक लाँच!

टीव्हीएस रेसिंगने १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी 'अपाचे ज्युनियर प्रोग्राम' सुरू केला असून त्यासाठी खास 'Apache RR 200 Mini GP' बाइक लाँच केली आहे. या उपक्रमाद्वारे तरुण रायडर्सना व्यावसायिक कोचिंग मिळून रेसिंग जगतात पुढे जाण्यासाठी एक मजबूत पाया आणि स्पष्ट मार्ग उपलब्ध होईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 28, 2026 | 03:34 PM
लहान मुलांसाठी TVS ची पहिली रेस बाइक! 20 PS पॉवर अन् 110 चा स्पीड; TVS ची नवी Apache RR 200 Mini GP बाइक लाँच!
Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएस रेसिंगने १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी ‘अपाचे ज्युनियर प्रोग्राम’ आणि Mini GP बाइक लाँच केली.
  • या उपक्रमाद्वारे तरुण रायडर्सना ट्रॅकवर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रेसिंग जगतात प्रवेश करण्याचा मार्ग मिळेल.
  • ९० किलो वजन आणि २३ PS पॉवर असलेली ही बाइक खास रेसिंग ट्रॅकसाठी डिझाइन केली आहे.

टीव्हीएस रेसिंगने भारतातील तरुण रेसिंग गुणवत्ता शोधण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी Apache Junior Programme या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमासोबतच कंपनीने खास ट्रॅक ट्रेनिंगसाठी तयार केलेली Apache RR 200 Mini GP ही रेसिंग मोटारसायकलही सादर केली आहे. मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबद्वारे चालवल्या जाणाऱ्या मद्रास इंटरनॅशनल कार्टिंग एरिना येथे १० ते १४ वयोगटातील तरुण रायडर्स तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही बाइक चालवतील. या उपक्रमाची सुरुवात म्हणून टीव्हीएस रेसिंगने MMSC कडे १० Apache RR 200 Mini GP बाइक्स सुपूर्द केल्या आहेत.

ट्रेनिंग आणि रेसिंगचा मार्ग

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुण रायडर्सना अनुभवी प्रशिक्षक आणि टीव्हीएस रेसिंगच्या रायडर्सकडून शिस्तबद्ध कोचिंग दिले जाईल. यामध्ये रायडिंग तंत्र, ब्रेकिंग, कॉर्नरिंग, रेसिंग लाईन्स, मोटारसायकल नियंत्रण आणि ट्रॅकवरील सुरक्षितता यांसारख्या बाबी शिकवल्या जातील. ही बाइक भाड्यानेही उपलब्ध असणार आहे, ज्यामुळे पालकांना किंवा रायडर्सना स्वतःची रेस बाइक न खरेदी करताही प्रशिक्षण घेता येईल.

या उपक्रमामुळे व्यावसायिक रेसिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी एक स्पष्ट मार्ग उपलब्ध झाला आहे. हा प्रोग्राम पूर्ण करणारे रायडर्स वयाच्या १५ व्या वर्षी ‘TVS One Make Championship Rookie’ श्रेणीत प्रवेश करण्यास पात्र ठरतील. यानंतर यशस्वी रायडर्स ‘RR 310 Expert’ श्रेणीमध्ये जाऊ शकतात आणि टीव्हीएस रेसिंगच्या डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे व्यावसायिक रेसिंगच्या उच्च टप्प्यांपर्यंत पोहोचू शकतात.

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा

Apache RR 200 Mini GP चे वैशिष्ट्य आणि इंजिन

ही बाइक खास सर्किट रेसिंगसाठी डिझाइन केली गेली आहे. बाइकचे एरोडायनॅमिक्स बॉडीवर्क वजन कमी ठेवून हाय-स्पीडला स्थिरता देते. यात दिलेले CNC बिलेट-मशीन ॲल्युमिनियम ट्रिपल क्लॅम्प स्टिअरिंगची अचूकता वाढवते, तर फायबर कव्हर असलेली ॲल्युमिनियम फ्युएल टँक बाइकचे वजन मध्यभागी केंद्रित ठेवते, ज्यामुळे वळणावर बाइक सहज हाताळता येते.

या बाइकमध्ये RTR 200 4V चे रेस-ट्यून केलेले १९७.७५ cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, ज्याचा बोर ६६.० mm आणि स्ट्रोक ५७.८ mm आहे. यात ३० mm सेमी-फ्लॅट स्लाइड कार्ब्युरेटर, कॉनिकल एअर फिल्टर आणि रेस-स्पेक्ट फ्री-फ्लो एक्झॉस्ट सिस्टीम वापरण्यात आली आहे. हे इंजिन ९,५०० rpm वर २३ PS पॉवर आणि ६,५०० rpm वर २०.१ Nm टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे बाइकला ११० किमी/तास असा कमाल वेग मिळतो.

बाईकची सीट मॉडीफाय करायची आहे? या आहेत काही बेस्ट आयडिया आणि जरुरी गोष्टी

चेसिस, सस्पेंशन आणि ब्रेकिंग

या बाइकची चेसिस आणि रचना खास लहान मुलांच्या दृष्टीने सोपी आणि हलकी ठेवण्यात आली आहे. या बाइकचे एकूण वजन अवघे ९० किलोग्रॅम आहे, ज्यामुळे ती वळणावर आणि ब्रेकिंगदरम्यान सहज नियंत्रित करता येते. याचा व्हीलबेस १,१८० mm असून सीटची उंची ६९० mm ठेवण्यात आली आहे, जेणेकरून लहान रायडर्सचे पाय जमिनीवर सहज टेकू शकतील. स्टिअरिंग जॉमेट्रीमध्ये २३.५-डिग्री रेक अँगल आणि ६४ mm ट्रेल देण्यात आला आहे.

बाइकच्या फ्रंटला ३५ mm अपसाइड-डाऊन फॉर्क्स आणि रियरला रेस-स्पेक्ट मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे, जे दोन्ही पूर्णपणे ॲडजस्टेबल आहेत. ब्रेकिंगसाठी फ्रंटला २२० mm आणि रियरला १८० mm डिस्क ब्रेक्स दिले आहेत. ही बाइक १२-इंचाच्या हलक्या व्हील्सवर धावते आणि त्याला उत्तम ग्रिपसाठी युरोग्रिप रेस-कंपाउंड टायर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Tvs racing launches apache junior programme apache rr 200 mini gp automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • TVS

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
1

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
2

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
4

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.